शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयात बसविणार 'हेल्थ एटीएम'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:07 IST

६० चाचण्यांची सुविधा : रुग्णांचा अहवाल काही सेकंदात मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसह चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पहिल्यांदाच अत्याधुनिक 'हेल्थ एटीएम' बसवण्यात येणार आहे. या मशीनच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित ६० प्रकारच्या चाचण्या करता येईल. मात्र, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत हेल्थ एटीएम' बसविण्याचा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केला. हे एटीएम आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत परिणामकारक ठरणार असल्याचा दावा या विभागाकडून करण्यात आला. सुरुवातीला ४५ डिजिटल हेल्थ इंटिग्रेटेड किऑस्क म्हणजेच हेल्थ एटीएम मशीन आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्यामध्ये चंद्रपूरचे शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश आहे. यासाठी वैद्यकीय विभागाने २५.४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या मशीनमुळे रुग्णाचा अहवाल काही सेकंदात उपलब्ध होणार आहे. त्याचा वापर करणे अत्यंत सोपे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाला आरोग्य एटीएममधून आवश्यक त्या सूचना मिळतील. यात वाय-फाय सुविधाही राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

असा असेल 'हेल्थ एटीएम' रुग्णाला त्याचा मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल टाकल्यास संपूर्ण अहवाल मिळेल. त्यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेटची सुविधा आवश्यक असणार आहे. या एटीएममध्ये सहायक म्हणून पॅरामेडिकल कर्मचारी असतील. चाचणी अहवालाच्या आधारे रुग्णांना थेट संबंधित विभागाच्या डॉक्टरांकडे पाठवले जाईल. प्रत्येक ओपीडीमध्ये आवश्यकतेनुसार रुग्णांची रांग असेल, जेणेकरून डॉक्टरांना जास्तीत जास्त रुग्ण पाहता येतील.

अशा होतील तपासण्या ड्राय बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, चयापचय पृष्ठ, शरीरातील चरबी, हायड्रेशन, हृदय गती, उंची, स्नायूंचे प्रमाण, शरीराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, वजन अशा एकूण ६० चाचण्या केल्या जाणार आहेत. शरीर तपासणीसाठी १५ प्रकारच्या चाचण्या तत्काळ उपलब्ध होतील. याद्वारे जलद चाचणी, लघवी चाचणी, गर्भधारणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, मलेरिया, टायफॉइड, एचआयव्ही, ग्लुकोज, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल आदी चाचण्या करण्याचीही सुविधा आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealthआरोग्य