शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:38 IST

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अ‍ॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अ‍ॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांना त्रास, कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अ‍ॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अ‍ॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. मात्र सदर व्यवस्था सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व वाहतूक नियंत्रण विभागाला अपयश आले आहे.चंद्रपूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शहरामध्ये अ‍ॅटोरिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यास्थितीत चंद्रपुरात ३६०० च्या जवळपास अ‍ॅटोरिक्षा आहेत. त्यातही दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. चंद्रपुरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन रस्ते पुन्हा अरुंद केले आहे. तर शहरातील गांधी चौक, जटपूरा गेट, गिरणार चौक, रामनगर चौकातील मार्गावर अनेक बेलगाम आॅटो थांबून असतात. तसेच प्रवासी पाहून अनेक ठिकाणी आॅटोचालक आॅटो थांबवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. मात्र आॅटोचालकांवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आॅटोचालक बिनदिक्कतपणे रस्त्यावर आॅटो थांबवत आहेत. याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.अनेक अ‍ॅटोचालकांकडे परमिटच नाहीचंद्रपूर शहरात दिवसेंदिवस आॅटोरिक्षाची संख्या वाढत आहे. सद्यास्थित शहरामध्ये ३६०० च्या जवळपास आॅटोरिक्षा आहेत. तर अनेक आॅटोरिक्षाचालकांकडे परमिट नसतानासुद्धा सर्रास आॅटो चालवित आहेत. तर अनेकजण एकाच परमिटवर दोन ते तीन आॅटो चालवित आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.वाहनतळ वाढविण्याची मागणीचंद्रपुरातील आॅटोचालकांना ५७ अधिकृत वाहनतळ ठरवूण देण्यात आले आहेत. त्यामध्ये बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन, गिरणार चौक, रामनगर, बांग्ला चौक, सरकारी दवाखाना, गांधी चौक, बंगली कॅम्प यासह अनेक मुख्य चौकांचा समावेश आहे. मात सदर वाहनतळ अपुरे पडत असल्याने १०४ अधिकृत वाहनतळ देण्याची मागणी आॅटोचालकांकडून होत आहे.प्रवाशांची लूटआॅटो संघटनेने शहरातील दर निश्चित केले आहे. मात्र अनेक आॅटोचालक या नियमांचे उल्लंघन करुन प्रवाश्यांकडून अतिरिक्त दर आकारत आहेत. अनेकदा नवखा प्रवाशी हेरुन आॅटोचालक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकडत असतात. यावर निर्बंध लादण्याची मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.