शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तो... जागतो अन् शहर झोपते

By admin | Updated: July 2, 2016 01:07 IST

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस रात्री गस्त घालतात. त्याचा पोलिसांना मोबदला मिळत असतो.

नागरिक निश्चिंत : पोटासाठी जीव मुठीत मात्र मोबदला अल्पचिमूर : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस रात्री गस्त घालतात. त्याचा पोलिसांना मोबदला मिळत असतो. मात्र शासनाचा कुठलाही मोबदला नसताना जनतेनी दिलेल्या दातावर तो मागील एका तपापासून चिमूर शहरात जागतो अन चिमूरकर रात्रीला निश्चित होवून परिवारासह झोपतात.मूळचा नेपाळ येथील बलमी गावचा रहिवासी असलेला लक्ष्मण ठाकूर (गोरखा) मागील १४ वर्षांपासून चिमूरकरांना एका सिट्टी व दड्यांच्या साह्याने पूर्ण रात्र जागून शहरातील गल्ली बोळातून फिरत जागते रहो.. असा आवाज देत चिमूरकराच्या लाखो रुपये किंमतीच्या मालमत्तेचे संरक्षण करीत आहे. चिमूर शहरात विविध शासकीय कार्यालये आहेत. सोबतच चिमूर शहरात मोठी बाजारपेठ आहे. चिमुरातील १५ हजार नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण ठाकूर (गोरखा) रात्री ९ वाजता घराच्या बाहेर पडतो. हातामध्ये एक लाकडी दंडुका व शिट्टी याच्या सहाय्याने गोरखा रात्रभर फिरत असतो. घरुन निघताना सकाळी घरी परत जाणार की नाही, याचाही हमी नसते. कारण कीर्र रात्री फिरताना पावसात निघणारे सरपटणारे प्राणी किंंवा दरोडा घालणारे दरोडेखोर यांच्या हल्ल्यातून कधी काय होणार, याचाही नेम नसतो. पाऊस, थंडीची तमा न बाळगता नागरिकांच्या जीविताची सुरक्षा करतो. मात्र त्याच्या श्रमाला आजही मोल मिळत नाही. त्यामुळे गोरख्याला मिळेल त्या पैशावर समाधान मानावे लागते. वेळ प्रसंगी नागरिक त्याला पाच रुपयाचे नाणेदेखील हातावर ठेतात. मात्र परिवाराच्या पालनपोषणासाठी तो स्वत: जागून दुसऱ्यांना सुरक्षा देत आहे.गोरख्या (ठाकूर) आपली कर्मकहानी सांगताना म्हणाला की, पूर्वजापासून आत्मरक्षणाची कला आत्मसात केली अन् तीच कला नागरिकांना सुरक्षा देण्याच्या कामात येत आहे. यातून खुप कमी मोबदला मिळतो. त्यामुळे दोन मुलाचे शिक्षण कसे करावे हा प्रश्न ही उभा ठाकला आहे. बालाजी मंदिराच्या खोलीत राहत असल्याने किराया लागत नाही. मात्र मुलाचे शिक्षणाचा गंभीर प्रश्न पडला आहे. नागरिक दहा- २० रुपये देतात. त्यातून महिन्याला पाच- सहा हजार जमा होतात. त्यावरच आपली उपजिविका सुरू आहे. मात्र दिवाळीला कुणी भेट सुद्धा देत नसल्याची खंत लक्ष्मण (गोरखा) यांनी व्यक्त केली. मात्र मोबदला कमी असला तरी हे काम मी निरंतर करत राहणार असल्याचेही लक्ष्मण ने सांगितले. (प्रतिनिधी)गोडे ज्वेलर्स दुकानातला मोठा दरोडा फसलानुकताच भर वरणीतील गोडे ज्वेलर्स येथे दरोडेखोर दरोडा घालीन असताना गोरखाला एक व्यक्ती दिसला तेव्हा गोरखाने ओरड केली. मात्र गोरख्याला दरोडेखोरांनी गोटमार केली. या गोरख्याच्या ‘एन्ट्रीन’ जास्त प्रमाणात लुटणारा माल कमी नेता आला. त्यामुळे पूर्ण दुकान साफ करण्याचा प्रयत्न दरोडेखोरांचा फसला.मागील १४ वर्षांपासून चिमूर शहरात रात्री ‘जागते रहो’ म्हणत चिमूरकरांना सेवा देत आहे. मात्र मोबदला खूप कमी मिळत आहे. वाढत्या महागाईत घर खर्च एवढ्याच्या रक्कमेत घर खर्च भागवते व मुलांचे शिक्षण करणे कठीण झाले आहे.- लक्ष्मण ठाकूर (गोरखा), चिमूर