शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाच किमी अंतरावरील वाहनांना टोल मुक्तीसाठी ग्रामस्थ कायम

By admin | Updated: January 14, 2015 23:05 IST

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावाजवळ असलेल्या टोल परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या ग्रामस्थांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्यात यावी याकरिता वरोरा येथील शासकीय

वरोरा : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावाजवळ असलेल्या टोल परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या ग्रामस्थांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्यात यावी याकरिता वरोरा येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत आजही ग्रामस्थ आपल्या मागणीवर कायम होते. या बैठकीत तोडगा निघु शकला नाही. त्यामुळे आमदार धानोरकर यांनी मध्यस्ती करीत गुरूवारी (दि.१५) पुन्हा कंपनी अधिकारी, ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक बोलाविली.नंदोरी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याजवळून सर्व्हीस रोड तयार करण्यात आला नाही. नंदोरी, भटाळी आदी गावातील नागरिकांच्या शेती मोठ्या प्रमाणात आहे. शेतात बैलबंडीने टोल नाक्यावरून जाताना जिकरीचे होत आहे. ट्रॅक्टर व लहान चार चाकी वाहनाने शेतात साहित्य घेवून जात असताना शेतकऱ्यांना वारंवार टोल टॅक्स भरावा लागत असल्याने नंदोरी, भटाळी परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करीत आहे. त्यामुळे टोलटॅक्स परिसरातील पाच किमी अंतरापर्यंत असलेल्या नागरिकांच्या वाहनांना टोल मुक्ती देण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. आज वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात आमदार बाळु धानोरकर यांच्या उपस्थितीत टोल कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. तेव्हा पाच किमी अंतरावरील वाहनांना टोल मुक्तीसाठी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) विभागाकडे टोलविली. यासोबतच टोल नाक्याजवळील सर्व्हीस रोडबाबतही टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस उत्तरे दिले नाही. त्यामुळे बैठकीत ग्रामस्थ आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत टोल मुक्तीवर ठाम राहिले. टोल कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आमदार धानोरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याशी बोलुन बैठकीचे आयोजन केले आहे. आनंदवन चौकात उड्डानपूल, बोर्डा चौकात सर्व्हीस रोड तथा इतर समस्यांबाबत चर्चा करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)