लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वडिलांची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची कबुली संबंधित मुलाने दिली आहे. ही घटना जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सिंधी येथील आहे.येथील विरुर स्टेशनच्या हद्दीत रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात तपास सुरू केला असता, मुलाने वडिलांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयावरून त्याला बोलते केले असता त्याने खुनाची कबुली दिली.
वडिलांची हत्या करून मृतदेह टाकला रेल्वेरुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 16:31 IST