शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ वेदना घेऊन वाहतो आयुष्याचे ओझे !

By admin | Updated: August 30, 2014 01:16 IST

जीवन जगताना असंख्य अडचणी. सुख-दु:खाचा चढ-उतार. यावर मात करीत जो समोर जाणे, यालाच जीवन म्हणतात.

राजकुमार चुनारकर खडसंगीजीवन जगताना असंख्य अडचणी. सुख-दु:खाचा चढ-उतार. यावर मात करीत जो समोर जाणे, यालाच जीवन म्हणतात. अशा सुंदर जीवनाचे स्वप्न रंंगवून पत्नी व तीन मुलांसोबत सुखाने संसार सुरु होता. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. रेल्वे अपघात दोन्ही पाय कटले. सात जन्माची साथ देण्याचे वचन देणाऱ्या पत्नीनेही अर्ध्यात साथ सोडली. पैसे कमविण्याचा पर्याय नाही. मात्र, जिद्द न हारता सहा वर्षीय बालिकेला घेऊन जीवनाशी संघर्ष सुरु आहे. मन हेलावून टाकणारी ही कहाणी आहे, भद्रावती तालुक्यातील गवराळा येथील नागेश माणिक अंबलवार यांची. नागेशचा विवाह तुलशी नामक मुलीशी झाला. लग्नानंतर संसार सुखाने सुरू होता. त्यांच्या संसार वेलीवर संतोष (९), नंदिनी (६) व नीलेश (३) अशी तीन फुले ! आपल्या परिवारासह सुखाने राहत असताना, २००९ मध्ये अचानक रेल्वे अपघात नागेशचे दोन्ही पाय कटले. त्यामुळे नागेश या अपघाताने पूर्ण खचला. माझ्या परिवाराचे काय होईल, या चिंतेने त्याला ग्रासले. काही कालावधी करीता पत्नी तुलशीने साथ दिली. मात्र सात जन्माचे वचन घेतलेल्या पत्नीनेही नागेशला सोडून दिले. तिने संतोष व नीलेश या दोन मुलांना घेऊन दुसरा आधार शोधला. पत्नी सोडून जाण्याचा धक्काही नागेशला दु:खाच्या खाईत लोटून गेला. मात्र, नागेशने जगण्याची आस सोडली नाही.रेल्वेच्या अपघातात दोन्ही पाय गमावण्याचा दुर्दैवी प्रसंगी आल्यावरही न घाबरता तो चारचाकी गुळगुळीवर बसून आपल्या सहा वर्षीय नंदिनीसह आयुष्याचे ओझे वाहत आहे. राहायला निवारा नसल्याने आकाशालाच नागेशने घर मानून बल्लारपूर रेल्वे स्थानकाचा आसरा घेत आपले जीवन काढत आहे. दोन्ही पायाने अपंग असलेला नागेश पाट्याच्या तराप्याला चाके लावलेल्या पाटीवर बसून नंदिनीला मागे घेवून लोकांकडून पैसे मागत असते. नागेशची अवस्था व चिमुकल्या नंदिनीला बघून अनेकांना पाझर फुटतो व सरळ हाताने महिला, पुरुष मदत करतात. या आलेल्या मदतीनेच नागेश व नंदिनीच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होते.आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचा बाहु करत चिंतेत राहण्यापेक्षा मनोरंजनातून काही काळ निघावा. यामुळे नागेश सिनेमा बघणे पसंत करतो. त्याने बाजीराव सिंघमच्या चित्रपटाच्या प्रेमापोटी बल्लारपूर ते चंद्रपूर असा बसचा प्रवास करुन चित्रपट बघितला. नागेशला हा सिनेमा आवडला, असे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने नागेशला बोलके केले असता, नागेशने आपली करुन कहाणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. नागेशला भेडसावत आहे ती चिमुकल्या नंदीनीची काळजी. नंदिनीचे पुढे काय होणार, याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. नागेशला दोन्ही पायाने अपंगत्व आल्यावरही व पत्नीनेही अर्ध्यातच साथ सोडली तरी तेवढ्याच हिंमतीने आलेल्या दु:खाला सामोरे जात आहे. अनेकजण दु:खाचा सामना न करता जीवन संपविण्याचा प्रयत्न करतात असे अनेक उदाहरणे बघायला मिळतात. त्यांच्यासाठी नागेश हा आदर्शच आहे.