शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

संघटन वाढविण्याचे ध्येय बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:08 IST

माधवी नाईक : भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची बैठकआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे संघटन कार्य गतीशीलतेने सुरु आहे. महिलांचे राज्यात भक्कम संघटन उभे करण्याकरिता जिल्हा तालुका व ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित ध्येय बाळगून महिलांची संघटन शक्ती मजबुतीने उभी करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला ...

माधवी नाईक : भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची बैठकआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे संघटन कार्य गतीशीलतेने सुरु आहे. महिलांचे राज्यात भक्कम संघटन उभे करण्याकरिता जिल्हा तालुका व ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित ध्येय बाळगून महिलांची संघटन शक्ती मजबुतीने उभी करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक केले.स्थानिक शासकीय विश्रामगृहात चंद्रपुरातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या.या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष तथा आ. नाना श्यामकुळे प्रदेश महिला आघाडीच्या महामंत्री माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रेणुका दुधे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा महामंत्री तथा पं.स. पोंभुर्णाच्या सभापती अल्का आत्राम, मुलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, बल्लारपूरच्या न.प. उपाध्यक्षा मीना चौधरी, प्रदेश कार्यकारीणी सदस्या वंदना आगरकाटे, वैशाली जोशी, झोन सभापती आशा आबोजवार, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, नगरसेविका शिला चव्हाण, गुडधे, अश्विनी आवळे, स्मीता नंदनवार आदी उपस्थिती होती.अ‍ॅड. माधवी नाईक यांनी या बैठकीत महिलांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. आगामी संक्रातीसणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण विषयक योजना सर्वसमावेशक व्हाव्या याकरिता महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करुन वंचित महिलांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीमध्ये अ‍ॅड. नाईक यांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कार्यातील अडचणी समजून घेतल्या. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.