शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घरेलू कामगारांची नोंदणी केली का? नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:23 IST

तुटपुंज्या पगारात घर चालविणे होते कठीण : कामगारांना विविध लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : घरगुती काम करणाऱ्या महिला, पुरुषांना अनेकवेळा तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. मात्र, यातून ते शक्य होत नाही. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना सुरू केली आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन या कामगारांना विविध योजनांचा लाभमिळवून दिला जातो.

या योजनांच्या माध्यमातून कामगारांना जगणे सुसह्य होत असून अनेकांना याचा लाभसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य कामगारांनीही नोंदणी करून योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. 

कामगारांच्या पाल्यांना इयत्ता नववी ते बारावीकरिता तसेच आयटीआयचा कोर्स करत असल्यास दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास, दर तिमाहीकरिता ३०० रुपये जास्तीत जास्त दोन मुलांकरिता दिले जातात. मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधी साहाय्य दोन हजार रुपये मिळतात. घरेलू कामगाराला दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता पाच हजार रुपये शासनाकडून मदत केली जाते. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे ९०० व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी ६५० रुपये देण्यात येतात. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने घरेलु कामगार असतानाही शासनदरबारी अगदीच अल्प कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य कामगारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे.

१० हजार भांड्यांचा संच यंदा नोंदणी असणाऱ्या बहुतांश घरेलू कामगारांना मिळाला, तसेच वयाची ५५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना एकदाच १० हजार रुपये शासनाकडून मिळतात.

ही आहेत लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, नोंदणी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील, जेथे काम करत आहे तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता.

चंद्रपूर शहरात अनेक घरेलू कामगार वंचित ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये घरलू कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र अनेक कामगार हे संघटनात्मक जुळलेले नसल्याने, नोंदणीकृत संस्थेत जोडले नसल्याने या कामगारांना लाभ मिळत नाही.

नोंदणी कोठे व कशी करायची?

  • जिल्हा सहायक कामगार अधिकारी यांच्याकडे नोंदणी करता येते. त्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्रातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. अर्जदार घरगुती कामगार असणे आवश्यक आहे. 
  • घरकाम करणारा व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या अन्य योजनेंतर्गत लाभ घेता असता कामा नये. अर्जदार व्यक्तीची घरकाम कामगार संघटनेमध्ये नोंदणी आवश्यक आहे.

घरेलू कामगारांना हे मिळतात लाभनैसर्गिक मृत्यू - ३०,००० अपंगत्व  - ७५,००० अपघाती मृत्यू  - ७५,००० अंशतः अपंगत्व  - ३७,५००

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर