२६ फेब्रुवारीला नागपुरात पुरस्कार प्रदान सोहळाचंद्रपूर: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५१ व्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वा. सावरकर स्मारक समिती नागपूरच्या वतीने सन २०१७चा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना जाहीर करण्यात आला आहे.स्वातंत्र्यविरांच्या विचारांचे पुरस्कर्ते तसेच त्यांच्या राजकीय व सामाजिककार्याचा, विचाराचा सदोदीत प्रसार व प्रचार करण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण २६ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता नागपुरातील महाल स्थित शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात मान्यवर नेते व अतिथींच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.११ हजार रुपये रोख शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सन्मानपत्र या पुरस्काराचे स्वरूप असून आजवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना या सन्मानजनक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख अतिथी म्हणून तर प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
हंसराज अहीर यांना सावरकर गौरव पुरस्कार जाहीर
By admin | Updated: February 20, 2017 00:28 IST