बॉक्स
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
सायबर चोरटे अत्यंत चपळाईने पैसे लंपास करीत असतात. आपणच ओटीपी देत असल्याने त्यांना पैसे पळविण्यास सोपे जाते. असा प्रकार घडल्यास बॅंक, सायबर पोलीस आदी ठिकाणी चकरा माराव्या लागतात. परंतु, पैसे मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे असते.
कोट
कोणतेही अधिकारी बॅंकेसंदर्भातील वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. त्यामुळे कोणालाही आपल्या बॅंक खात्यासंदर्भातील वैयक्तिक माहिती देऊ नये. फसवणूक झाली असेल, तर न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी.
- निशिकांत रामटेके, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस
----
अशी होऊ शकते फसवणूक
प्रकरण १
बॅंकेच्या मुख्य शाखेतून अधिकारी बोलत आहे. तुम्ही तुमच्या खात्याचे केवायसी केले नाही. तुमचे खाते बंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या खात्याची बॅंक डिटेल्स द्या, असे सांगून माहिती विचारून घेतली. काही क्षणातच बॅंक खात्यातून रक्कम लंपास झाली. त्यानंतर त्या नंबरबर फोन केल्यानंतर नंबर चुकीचा असल्याचे सांगितले.
-----
तुम्हाला लकी ड्राॅ लागला आहे. त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा करायची आहे. त्यासाठी तुमच्या बॅंक खात्याची माहिती हवी आहे, असे सांगून बॅंक खात्यासंदर्भातील वैयक्तिक माहिती विचारुन घेतली आणि बॅंक खात्यातून रक्कम लंपास झाली. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यासंदर्भात माहिती घेतल्यास पत्ताच चुकीचा आढळून आला.
-------
प्रकरण ३
बॅंकेच्या पहिल्या शंभर भाग्यवान ग्राहकांमध्ये आपली निवड झाली आहे. तसेच तुम्हाला एक लाईफटाईम पॉलिसी दिली जात असल्याची बतावणी देत बॅंक डिटेल्स विचारून खात्यातून रक्कम लंपास करण्यात आली. बॅंकेमध्ये विचारपूस केली असता, आम्ही असा कॉल केलाच नसल्याचे सांगितले.