शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिविरोधात एक हजार प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

By admin | Updated: April 8, 2017 00:45 IST

पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या ...

सुभाष धोटे : प्रकल्पग्रस्तांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणारराजुरा : पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या वेस्टन कोलफील्ड लिमिटेडविरोधात तापलेल्या उन्हात एक हजार महिला--पुरुषांचा मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चा मुख्य मार्गानी निघाला. राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने, बाळू जुल्मे, विलास घटे, महेश गाडगे, राजू मोहारे, बालाजी कुबडे, बालाजी पिंपळकर, राजू पिंपळकर, दिनेश वैरागडे, सतीश बानकर, रवी बोबडे, दिलीप नरड, रवी बेले, आकाश चन्ने, नितीन भटारकर, दीपक खनके आदी उपस्थित होते.२०११ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. सेक्शन अकरामुळे शेतीचा कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. जमिनीचा सातबारा असतानासुद्धा हलाखीचे जीवन जगत आहे.वेकोलिच्या विरोधात १ हजार ८० प्रकल्पग्रस्त विविध आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीनी हिसकावल्या. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न करण्यास शेतकरी हवालदिल झाले आहे. या प्रकल्पग्रस्तांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. यापूर्वी वेकोलिचे अधिकारी डॉ. सजीवकुमार, आनंद आझमी, एम. येलय्या, एम.पी. नवले, तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सभा घेतली. ३१ मार्चला बोर्ड आॅफ डायरेक्टरची सभा घेऊन प्रकल्पाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय गृहमंत्री ना. हंसराज अहीर यांनी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा असून मागील पाच वर्षापासून शेतकरी नोकरीपासून वंचित असल्याने मोठे नुकसान झाले आहे. न्याय न मिळाल्यास खदान बंद करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार मागील पाच वर्षांपासून राजुरा तालुक्यातील धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील १ हजार ८० प्रकल्पग्रस्त सतत लढा देत असून यापुर्वी आमरण उपोषणसुद्धा केले होते. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून काँग्रेसतर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. शेकडो शेतकरी भर उन्हात आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. केवळ आश्वासन देवून चालणार नाही. प्रत्यक्षात कृती करा अन्यथा काँग्रेस मोठे आंदोलन उभे करील, असेही माजी आमदार धोटे यांनी बजावले आहे.