शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

नोकरी टिकविण्यासाठी गुरूजी निघाले गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 22:35 IST

‘नोकरी टिकवायची तर विद्यार्थी शोधा’ असा अलिखित फतवा शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली.

ठळक मुद्देसंस्थाचालकांचा दबाव : विविध शाळा दाखवत आहेत आमिषे

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ‘नोकरी टिकवायची तर विद्यार्थी शोधा’ असा अलिखित फतवा शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे.मागील १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली. याला नवीन शिक्षण धोरण जबाबदार आहे. बहुतांश मोठ्या गावांमध्ये अनेकांनी शाळा सुरू केल्या. यामुळे विद्यार्थी मिळणे कठीण झाले. विद्यार्थी शोधता-शोधता शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहे. इंग्रजी माध्यामांच्या शाळा वाढल्याने पुन्हा आपत्तीची कुऱ्हाड कोसळली.इंग्रजी माध्यम, जिल्हा परिषद आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांवरही मोठा परिणाम दिसू लागला. पालकांचा कल कॉन्व्हेंटकडे असल्याने जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर परिणाम झाला. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नोकरी करणारे शिक्षक पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढून घेतात. पण सद्यस्थितीत हे समीकरणच बदलले आहे.शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवत आहे पाचवी आणि आठवीच्या तुकडीसाठी आवश्यक असलेले किमान विद्यार्थी कसे मिळविता येतील, याच खटाटोपामध्ये प्रत्येक शाळांचे शिक्षक तालुक्यात दिसत आहेत. नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी शोधा, असा आदेश दिला. विद्यार्थ्यांच्या अभावामुळे एखादी तुकडी कमी झाली तर शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे नोकरीच्या धास्तीपोटी शेकडो शिक्षक विद्यार्थी शोध मोहिमेला गावागावांत भटकंती करीत आहेत. विद्यार्थी मिळविण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात. त्याची 'पूर्तता' शिक्षकांकडूनच केली जात आहे. परिणामी, उन्हाळी सुट्ट्या लागूनही शिक्षकांचा आनंद हिरावून घेतला आहे.पायाभूत सुविधांचा अभावअनेक शाळांना विद्यार्थी मिळत नाही, यासाठी विविध कारणे आहेत. परंतु, कुटुंब नियोजन हेही कारण कारणीभूत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक कुटुंंबाला लहान कुटुंबाचे महत्त्व कळायला लागले आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ या संकल्पनेवरून आता अनेकांनी एक मुलीवर किंवा मुलावर कुटुंब नियोजन करीत आहेत, त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या तुकडीवर झाला आहे. विशेष म्हणजे शाळा चालविताना विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याकडे संस्थाचालकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याची टीका पालकांनी केली.कॉन्व्हेंट कल्चर गावखेड्यांतप्राथमिक व माध्यम शाळांसारखीच कॉन्व्हेंटचीही परिस्थिती झाली आहे. नागभीड शहरात कॉन्व्हेंटचे लोन पसरले आहे. कथित गुणवत्तेचे ढोल वाजवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. पण, त्या तुलनेत दर्जेदार सुविधा पुरविल्या जात नाही. विद्यार्थीच मिळत नसल्याने कॉन्व्हेंटचालकांना विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना गावागावांमध्ये पाठवित आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक