वरोरा : तालुक्यातील गट ग्रामपंचायत महाडोळी अंतर्गत येत असलेल्या शेगाव (खु.) येथे पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहे. या योजनेच्या कामात अनियमितपणा आहे. त्यामुळे भविष्यात शेगाव (खु.) वासीयांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याने यातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी शेगाव (बु.) येथील गुरुदेवभक्त आज शनिवारी वरोरा पंचायत समिती कार्यालयावर धडकले.महाडोळी गट ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या शेगाव येथे चालु वर्षात १७ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाडोेळी ग्रामपंचायतीमध्ये शेगाव (खु. ) येथील एकही सदस्य नसल्याने विद्यमान पदाधिकारी शेगाववासीयांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप शेगाव(खु.) ग्रामस्थानी एका निवेदनाद्वारे करीत महाडोळी गावात बोअरवेल खोदण्यात आली आहे. बोअरवेल बंद पडल्यास त्याठिकाणी रस्ता नसल्याने दुरुस्त करण्याकरिता वाहनही जाणार नसल्याने दुरुस्तीची मोठी समस्या उभी राहणार आहे. महाडोळी गावानजिक बोअरवेल मधून शेगाव गावात पाणी आणावे लागणार असल्याने पाईप लाईनचा खर्च अधिक होणार आहे. त्यामुळे शेगाव गावालगत २०० फुटाऐवजी ४०० फुट बोअरवेल खोदावी, सिमेंट क्राँकीटची टाकी बांधून प्रत्येक घरी नळ जोडणी करून स्थायी लाभ शेगाव (खु.) वासीयांना करुन देण्यात यावा, यासोबतच सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शेगावात सभा घेऊन पाणी पुरवठा देखरेख समिती स्थापन करावी, अशी मागणी शेगाववासीयांना निवेदनातून केली आहे. निवेदन संवर्ग विकास अधिकारी कृष्णकुमार ब्राम्हणकर व सभापती सुनंदा जीवतोडे यांना एका शिष्टमंडळामार्फत दिले. शेगावमधील पाचपैैकी चार हातपंप बंद आहे. शेगावातील जमिनीत जलसाठा नसल्याने महाडोळीनजिक बोअरवेल खोदल्याचे सचिव प्रविण उंदिरवाडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
गुरुदेवभक्त पंचायत समितीवर धडकले
By admin | Updated: February 22, 2015 00:58 IST