शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी प्रकरणात आरोपपत्र दाखल

By admin | Updated: October 24, 2015 00:31 IST

बहुचर्चित गुंठेवारी प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण ५४ जणांवर आज शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

५४ जण सहभागी : ७२ एकर कृषक जमीन अकृषकब्रह्मपुरी : बहुचर्चित गुंठेवारी प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण ५४ जणांवर आज शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. अटकसत्र प्रक्रियेला पूर्णविराम मिळून आता या न्यायालयात खटला सुरू राहणार आहे.ब्रह्मपुरीच्या इतिहासात कधी नव्हे एवढे गुंठेवारी प्रकरण गाजले. कायद्याच्या भाषेत ‘गुंठेवारी’ या शब्दाचा अर्थ चुकीचा काढून शहरातील ७२ एकर कृषक जमीन अकृषक करण्यात आली होती. हे प्रकरण जेव्हा उघडकीस आले, तेव्हा अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर क्रमाक्रमाने अटकसत्र सुरू झाले होते. अटकसत्रात तत्कालिन उपविभागीय अधिकारी अरुण झलके, तत्कालिन मुख्याधिकारी रुपेश चव्हाण, नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता जयपाल बेदरे यांच्यासह नगरसेवक, बिल्डर, भूखंड मालक आदींचा समावेश होता. तत्कालिन तपास अधिकारी हेमंत खराबे यांनी तब्बल एक वर्षांपासून या प्रकरणाला तपासून घेत अनेकांची नावे या प्रकरणात समाविष्ट करून घेतली होती. त्यापैकी अनेकांनी अटकपूर्व जामीन मंजूर करुन घेण्यात यश मिळविले होते. परंतु आज या प्रकरणी न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याने अटकसत्र येथे थांबलेले आहे. ज्या ५४ आरोपीविरुध्द आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू राहणार आहे. ज्या प्लॉटधारकांनी प्लाट घेतले आहेत, त्यांचे भविष्य अधांतरी असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)