शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

हातावर गोंदविले ‘मेरा पीएम फेकू है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:18 IST

वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देघोषणाबाजी : सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आगळेवेगळे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी धरणेही देण्यात आले.यावेळी काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तथा जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, जिल्हा काँ्रग्रेस कमेटीच्या सचिव तथा जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी जि.प. सदस्य कैन्हय्यालाल जयस्वाल, पं.स. सदस्य संजीवनी भोयर, जेष्ठ नेते वसंत विधाते, नगरसेवक विठ्ठल टाले, पुरुषोत्तम निखाडे उपस्थित होते.कॉग्रेस सरकारला गॅस सिलिंडर ३९६ रुपयांपर्यंत नेण्यास ४५ वर्ष लागली. मात्र भाजप सरकारने तीन वर्षात ३९६ रुपयांचे सिलिंडर ७८४ रुपयांपर्यंत पोहचविले. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होत असनानाही पेट्रोल - डिझेलची भरमसाठ दरवाढ झाली आहे. एका महिन्यात पेट्रोलच्या किमतीत १६ रुपयांची दरवाढ करण्यात आली. शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा करण्याºया भाजप - सेना सरकारच्या कार्यकाळात शेतमालाला भाव नाही. तसेच शेतकºयांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. किचवट नियमामुळे कर्जमाफी फसवी ठरली आहे,नोटबंदीमुळे काळा पैसा सापडलाच नाही. मात्र सामान्य नागरिकांची वाट लागली. उद्योग धंदे डबघाईस आले असून अर्थ व्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. दरवर्षी देशात दोन करोड नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मोदी सरकारने केली. मात्र प्रत्यक्षात सरकारने असे केले नाही.एवढेच नाही तर ४५ लाख गरीब कुटुंबियांना राशन कार्डवर मिळणारी साखर बंद केली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून आता गरिबांना साखर मिळणार नाही. जीवनावश्यक वस्तूची भाववाढ, विजेची दर वाढ करून जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे. विदेशी बँकेतील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याची मोदी सरकारची घोषणा फसवी ठरल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले. १५ लाखांपैकी पाच रुपये तरी जनतेला मिळाले का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षांकडून रविवारी हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधी नारे देत 'मेरा पी.एम. फेकू है' असे हातावर गोदवून घेतले.या आंदोलनात मनीष जैस्वाल, राजू जाजुरले, गिरीधर कष्टी, मिलिंद भोयर, शिरोमणी स्वामी, नलिनी आत्राम, दुर्गा ठाकरे, स्वाती भोयर, इकबाल सिद्दीकी, रामभाऊ ताजने, चिंतामणी आत्राम, विनोद लांबट, जयश्री सरोदे, माया डोंगरे, शंकर खैरे, आदर्श आवारी, समर्थ बोढे, अजय ठाकरे, विकास धनदरे, पुरुषोत्तम कुडे, नारायण निखाडे, गोपाळ घाटे, निखिल सरोदे, मंगेश मासाडे, सोमदेव कोहाड, सचिन भोयर, शुभम चांभारे, अमोल सेलकर, सलीम पटेल, इकबाल शेख, चरण मोडक व शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक आश्वासन फसवे- विजय देवतळेतीन वर्षांपासून भाजपा सरकार खोटे आश्वासन देऊन केंद्रात व नंतर राज्यात बसली. मात्र या तीन वर्षात या सरकारने फेकू आश्वासन देऊन जनतेची फक्त दिशाभूल केलेली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येणार अशी केवळ अफवा पसरवली. विदेशातील काळ्या पैशाचे काय झाले काहीच माहीत नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणणारे आता मूग गिळून आहेत. मुलांच्या परीक्षेच्या वेळेस लोडशेडिंग करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम या फेकू सरकारने केले आहे. यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे रविवारी धरणे आंदोलन व हातावर ‘हमारा पी.एम. फेकू है' असे गोदवून या सरकारचा निषेध करीत असल्याचे डॉ. विजय देवतळे यावेळी म्हणाले.