शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कचरा वेचणाऱ्या चिमुकल्यांसोबत उभारली भावस्पर्शी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:53 IST

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही.

ठळक मुद्देगाडगेबाबा वाचनालयाची सामाजिक बांधिलकी : मराठी नववर्षाची अनोखी भेट

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही. उकीरड्यावर कचºया वेचणाºया चिमुकल्यांच्या नशिबी तर दारिद्र्य पाचवीलाच पूजले असते. समाज व्यवस्था याकडे सदैव दुर्लक्ष करते. अशातही काही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. भावस्पर्शी व स्नेहाची अनोखी गुढी उभारून सामाजिक बांधिलकीचा परिचय देत आहेत. असाच प्रसंग बल्लारपूर येथे रविवारी दिसून आला. येथील संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाने कचरा वेचणाºया चिमुकल्यासोबत भूतकाळातील स्वप्ने विसरायला लावणारी भावस्पर्शी गुढी उभारल्याच वास्तव समोर आले.मराठी माणूस संस्कृतीची जोपासना करणारा आहे. संस्कृतिला उत्सवाची जोड देणारा आहे. यात सामाजिक भाण ठेवणाराही आहे. सुखसमृद्धीची गुढी उभारून नव्या वर्षात वाटचाल करताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे आल्याचा प्रत्यय यातून दिसून येतो. बल्लारपुरात ज्या चिमुकल्यांची पहाट कचरा वेचण्यासाठी हातात थैली घ्यावी लागते. पोेटाची खळगी भरण्यासाठी उकीरडा लागतो. रस्तोरस्ती कचºयांसाठी भटकंती करावी लागते. त्यातून मिळणाºया मोबदल्यावर पोटातील आग विझवावी लागते. शहरातील हे चित्र नेहमीचे आहे. अशा चिमुकल्यांच्या नशिबी सणाला गोडधोड तर दुर्लभच, अशा चिमुकल्यांच्या चेहºयावर आनंद फुलविण्याचे कार्य येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रीनिवास सुंचूवार यांनी केले. श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी पतसंस्था व संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाने उकीरड्यावर कचरा वेचणाºया शेकडो मुलांना खेळातील वस्तू दिल्या. पुरणपोळीचा आपुलकीच्या भावनेतून मायेचा घास भरविला. गोड गाठी देवून गुढी पाडव्याची भावस्पर्शी गुढी उभारली.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, माजी नगरसेवक वर्षा सुंचूवार, नायब तहसीलदार दुर्गा पुरोहित, हेमा डंबारे, माया मुदगल, मंडळ अधिकारी दिलीप भडके, पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, अजय मेकलवार, सुनील दडमल, दत्तराज कुळसंगे, आशिष समुद्रवार आदींनी उपस्थिती दर्शवून सामाजिक बांधिलकीची उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. गुढी पाडव्याचे औचित्यसाधून भावनेला स्पर्श करणारी गुढी उभारण्याचा प्रसंग समाजाला प्रेरणादायी ठरणारा आहे.