शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जीएसटीमुळे सराफा बाजारपेठ मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:25 IST

पूर्वी वॅट करप्रणाली होती. १.२० टक्के वॅट देताना ग्राहकांनाही फारसे जड जात नव्हते.

ठळक मुद्देलोकमत व्यासपीठ : सराफा व्यवसायिकांनी मांडल्या व्यथा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पूर्वी वॅट करप्रणाली होती. १.२० टक्के वॅट देताना ग्राहकांनाही फारसे जड जात नव्हते. मात्र आता ३ टक्के जीएसटी लागत असल्याने व्यवसाय करताना फार अडचणी निर्माण होत आहेत. ग्राहक झपाट्याने दूर चालला आहे. सराफा बाजारपेठ मंदावली आहे, अशी व्यथा चंद्रपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडली.‘लोकमत व्यासपीठ’ या सदराखाली सराफा व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी चंद्रपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाºयांना ‘लोकमत’ने पाचारण केले होते. या व्यासपीठावर बोलताना सराफा व्यावसायिकांनी सरकारच्या व्यापारी धोरणावर कडाडून टिका केली. यावेळी सराफा असोसिएशनचे सदस्य संजय सराफ म्हणाले, सरकारने मागील दिवाळीनंतर नोटबंदी केली. हा निर्णय अचानक आणि व्यापारपेठेत उलथापालथ करणारा होता. या नोटबंदीचा सराफा व्यवसायावरही परिणाम झाला. काही दिवस बाजारपेठेत शुकशुकाट होता. नोटबंदीचा हा परिणाम दीर्घकालीन नव्हता. सराफा मार्केटमध्ये रेलचेल वाढली. मात्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर सराफा व्यवसायात दूरगामी परिणाम झाला आहे. सोने-चांदी खरेदी करणाºया ग्राहकांवर आर्थिक बोझा पडत असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. चंद्रपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सत्यम सोनी म्हणाले, सरकार एकीकडे डिजिटल इंडियाची घोषणा करीत आहे. सर्व व्यवहार डिजिटल करीत आहे. मात्र दुसरीकडे यातूनही नागरिक व व्यापाऱ्यांचीच आर्थिक लूट करीत आहे. सोने खरेदी केल्यानंतर डेबीट कॉर्डद्वारे ग्राहकांनी पैसे दिल्यानंतर त्यातही १.२० टक्के जीएसटी कपात केली जाते. डेबीट कॉर्डद्वारे व्यवहार करण्यावर शासन भर देत आहे तर या व्यवहारावर कुठलाही कर लादू नये, असेही ते म्हणाले. महाराष्टÑ सराफा महामंडळाचे उपाध्यक्ष राजेंद लोहा म्हणाले, चंद्रपूर शहरात ७० तर जिल्ह्यात २०० सराफा व्यापारी आहेत. अडीचशेच्या जवळपास कारागिर आहेत. या सर्वांच्या व्यवसायावर जीएसटीमुळे अवकळा आली आहे. जीएसटी लागू झाल्यापासून ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झाला आहे.पुन्हा जीएसटी वाढण्याचे संकेतसोने खरेदीत सध्या १० टक्के एक्साईज कर घेतला जातो. त्यानंतर ३ टक्के जीएसटीही लागते. आता सरकार एक्साईज कर कमी करून पुन्हा जीएसटी ३ टक्क्यावरून ५ टक्के करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. असे झाले तर ग्राहकांवर पुन्हा आर्थिक बोझा पडेल. एक्साईज कर ग्राहकांना दिसून येत नाही. मात्र जीएसटी ग्राहकांना दिसून येते. त्यामुळे ग्राहक सोने खरेदीपासून परावृत्त होतील, अशी भीतीही संजय सराफ आणि राजेंद्र लोहा यांनी व्यक्त केली.सरकारच्या धोरणामुळे सराफा व्यवसायावर अवकळा आली आहे. कधीकधी तर सकाळपासून दुकान उघडल्यानंतर सायंकाळी पहिला ग्राहक मिळतो. कारागिरांवरही वाईट दिवस आले आहे. चार-पाच दिवसानंतर कारागिरांना एखादे काम मिळते.-सत्यम सोनी,अध्यक्ष, चंद्रपूर सराफा असोसिएशन, चंद्रपूरशासनाने जीएसटी करप्रणाली लागू करून सराफा व्यावसायिकांवर अन्यायच केला आहे. दहा हजारांचे सोने खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ९०० रुपये जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे ग्राहक सोने खरेदीस धजावत नाही. शासनाने जीएसटी घ्यावा. मात्र तो दोन टक्क्यांहून अधिक घेऊ नये. आणि डिजिटल व्यवहारावर कोणताही कर लादू नये.-राजेंद्र लोहा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफा महामंडळ.सोने-चांदी चोरीसाठी कायद्यात ४११ कलम आहे. या कलमान्वये एखाद्या चोरट्याने एखाद्या सराफा व्यावसायिकाकडे ‘सोने येथे विकले’ असे म्हणत बोट दाखविले तर त्या व्यावसायिकाला अटक केली जाते. अनेकवेळा चोर खोटे बोलत असतो. मात्र व्यावसायिकाला त्याचा खोटारडेपणा सिध्द करता येत नाही. या कलममुळे व्यावसायिकात भीती निर्माण झाली आहे. यामुळे जो गरीब आहे, अडचणीत आहे, त्यालाही सोने देऊन मदत मिळू शकत नाही.-संजय सराफ,सदस्य, चंद्रपूर सराफा असोसिएशन, चंद्रपूर.पूर्वी लहान व्यापारी आनंदीत होते. समाधानी होते. मात्र आता जीएसटीमुळे त्यांचा व्यवसाय चौपट झाला आहे. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करून ठेवणेही ग्राहकांनी कमी केले आहे. कार्पोरेट शो रुममुळे फॅन्सी दागिन्यांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.-देवेंद्र मांडविया,सदस्य, चंद्रपूर सराफा असोसिएशन, चंद्रपूर.