शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

जलस्तर वाढीसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’

By admin | Updated: May 28, 2017 00:39 IST

धरणातील गाळ काढून मागेल त्याला तो गाळ शेतात पसरविण्यासाठी देण्याकरिता ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही महत्वाची योजना राबविण्यात राज्य शासनाने सुरूवात केली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार गाळ : खताच्या खर्चात ५० टक्के घटराजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: धरणातील गाळ काढून मागेल त्याला तो गाळ शेतात पसरविण्यासाठी देण्याकरिता ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही महत्वाची योजना राबविण्यात राज्य शासनाने सुरूवात केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या खर्चात सुमारे ५० टक्यापर्यंत घट होणार आहे.या योजनेमुळे घरणातील जलसाठा वाढून जनावरांना याचा लाभ होऊ शकतो तर गावातील जल स्तर वाढण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना फ ायद्याची ठरणार आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे आहेत. या धरणामध्ये आता काही प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ उपसल्यास पाणी साठवण क्षमता वाढेल. शिवाय धरणातील हाच गाळ शेतात पसरविल्यास कृषी उत्पन्न वाढीसाठीही त्याचा लाभ होवू शकेल. या दृष्टीने ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एक शासन निर्णय काढून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.राज्यातील धरणातून गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी स्वतंत्र धोरण व योजना तयार करण्याकरिता प्रधान सचिव स्तरावरील समितीने अभ्यास करून शासनास अहवाल दिला आहे.या अहवालानुसार २५० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या राज्यातील ८२ हजार १५६ धरणापैकी ३१ हजार ४५९ धरणांची जल साठवण क्षमता ४२.५४ द.ल.घ.मी. इतकी असून सिंचन क्षमता ८.६८ लक्ष हेक्टर आहे. सद्यस्थितीत या धरणामध्ये सुमारे ५.१८ द.ल.घ.मी. गाळ आहे. हा साचलेला गाळ उपसा करत शेतात पसविण्यासंदर्भातील समितीच्या शिफ ारशीला शासनाने तत्वता मान्य करत राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. ही योजना चार वर्षे टप्याटप्यात राबविण्यात येणार आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढूृन नेणे. आवश्यक गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामुग्री व इंधनावरील खर्च शासनाकडुन तसेच सीएसआरच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे. जिओ टॅनिग योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे स्वतंत्रपणे मुल्यमापन करण्यात येवून २५० हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व पाच वर्षापेक्षा जुन्या तलावांना प्राधान्यक्रम देवून केवळ गाळ उपसा करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र वाळू उत्खननास पुर्णता बंदी करण्यात आली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावनी चिमूर तालुक्यात करण्यात आली आहे. नुकताच जांभूळघाट येथील तलावाचा गाळ उपसा सुरू केला आहे. तालुक्यात २५ तलवाचा गाळ उपसा करण्याचे नियोजन टप्याटप्यात केले आहे. मात्र यामध्ये लोकसहभाग व सामाजिक संस्थेचा सहभाग महत्वाचा आहे.सनियंत्रण समिती स्थापन‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्याचसोबत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तर जिल्हाधीकारी यांच्या अधयक्षतेखाली जिल्हास्तरीय व उपविभागीय अधीकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सनियत्रंण समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. योजनेमुळे दुप्पट फ ायदा होणार असून या योजनेमुळे गावातील जलस्तर वाढविणास व नापिक जमीन सुपीक होण्यास मदत होवून शेतकऱ्याच्या पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.