शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

वाढीव गृहकराने मूलकरांची उडाली झोप

By admin | Updated: November 23, 2015 00:55 IST

नगर विकासासाठी संवेदनशील नसलेल्या मूल नगर प्रशासनाने सन २०१५-१६ या वर्षात चक्क चारपट गृहकर वाढविण्याचा प्रयत्न चालविला असून त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

नगर परिषद : सभेत २५ टक्के करवाढीचा प्रस्तावमूल : नगर विकासासाठी संवेदनशील नसलेल्या मूल नगर प्रशासनाने सन २०१५-१६ या वर्षात चक्क चारपट गृहकर वाढविण्याचा प्रयत्न चालविला असून त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. नगर परिषदेच्या सभेत पदाधिकारी व नगरसेवकांनी एकूण गृहकरावर २५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव पारित केला आहे. मात्र पालिकेने गेल्या २० वर्षापासून गृहकर न वाढविल्याने जिल्हाधिकाऱ्याने गृहकर वाढविण्याबाबत पत्र पाठविले आहे. गेल्या २० वर्षापासून टप्प्या-टप्प्याने गृहकर वाढविणे आवश्यक असताना तत्कालीन पदाधिकारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता त्याचा सरळ फटका नागरिकांना बसणार आहे. नगर परिषद मूलचे मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम ११९ पोट कलम १ अन्वये सन २०१५-१६ ते २०१८-१९ या वर्षापर्यंत सरसकट चार ते पाच पट फेर मुल्यांकनाची आकारणी करुन नागरिकांना नोटीस पाठविली आहे. तसेच अधिनियम १९६५ मधील कलम १२० अन्वये आपली काही उजर वा आपेक्ष असल्यास ३० दिवसाच्या आत लेखी सादर करण्याबाबत कळविले आहे. जवळपास सर्वच नागरिकांनी आक्षेप घेत लेखी पत्र सादर केले आहे. नियमानुसार दर चार वर्षानी फेरमूल्यांकन करून कर वाढविणे आवश्यक होते. मात्र तत्कालीन पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी कर वाढ केली नाही. ही बाब जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या लक्षात येताच त्यांनी करवाढ करण्याबाबत कळविले. त्याचा आधार घेत मुख्याधिकारी यांनी करवाढ करण्यासाठी नोटीस बजावली आहे. नागरिकांच्या मते २० वर्षांची सरसकट करवाढ करणे म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असून तत्कालीन प्रशासनाने केलेली चूक सर्वसामान्यांवर लादणे उचित नसल्याचे म्हटले आहे. विकासाबाबत संवेदनशील नसणाऱ्या पालिका प्रशासनाने नागरिकांना विविध सोई-सुविधा पुरवाव्यात. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने कर वाढ करावी. सरसकट वाढ करणे म्हणजे नागरिकांचे आर्थिक शोषण करण्याचा प्रकार असल्याचे, मत व्यक्त करीत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष पसरला असून पालिका प्रशासन नागरिकांना सुविधा पुरविण्यात दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही गृहकर वाढ थांबविण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)नगर परिषद स्थापनेनंतर सन १९९२ ला दोन टक्के करवाढ करण्यात आली होती. त्यानंतर दर वेळेस दोन ते तीन टक्के वाढ केली जात होती. मात्र प्रत्यक्षात सर्वेक्षण करून गृहकर आकारले गेले नव्हते. यावेळी प्रत्यक्ष घराचे सर्वेक्षण व मोजणी करून मूल्यांकन केले आहे. मूल्यांकनाप्रमाणे करवाढ केली नाही तर कर्मचाऱ्यांचे वेतन, अंशदान, पेंशन आदी सुविधा शासन पुरविणार नाही. करवाढ चार ते पाच पट वाढणार नसून मर्यादित वाढेल.- रवींद्र ढाके, मुख्याधिकारी न.प. मूलपालिकेने सभेत २५ टक्के करवाढ करण्याचा ठराव पारित केलेला आहे. करवाढ ही गेल्या २० वर्षापासून करण्यात आली नाही. ही बाब तत्कालीन प्रशासनाची चूक आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरणे उचीत नाही. मुख्याधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून कुणावरही अतिरिक्त भार पडणार नाही, याकडे लक्ष द्यावे.- प्रशांत समर्थ, सभापती बांधकाम न.प. मूल