शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे जत्थे परराज्यात

By admin | Updated: May 16, 2015 01:42 IST

१८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या ...

ब्रह्मपुरी : १८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या मध्यस्थीने त्यांना परराज्यात नेऊन अल्पदरात काम करवून घेतले जात आहे. यात काही प्रमाणात त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषणही केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची शासनाने दखल घेणे आता गरजेचे झाले आहे.शासनाच्या योजना चांगल्या असूनही योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात नसल्याने अनेक बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणानुसार काम मिळत नाही. दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कसे घ्यायचे, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. दोन-चार महिने कुठे तरी काम करावे, असा प्रयत्न सुरू असतो. परंतु शहरात व तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती अजूनही झाली नाही व मोठमोठ्या कारखान्याच्या निर्मितीचाही अभाव असल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या दुकानात नोकर राहण्यापलीकडे दुसरा रोजगार सध्या तालुक्यात अस्तित्वात नाही. म्हणून बेरोजगारांनी परराज्यात जाऊन काम करणे पसंत केले आहे. भरारमेंढा, किन्ही, किरमिरी (मेंढा) हळदा, आवळगाव व अन्य भागातून अनेक बेरोजगार बंगलोर, हैद्राबाद, कोलकत्ता अशा मोठ्या महानगरात स्थानिक ठेकेदारांच्या मध्यस्थीने नेऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. या कामाचा मोबदला देताना त्यांची काही प्रमाणात शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक शोषणही केले जात असल्याची माहिती परतून आलेले युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. शासनाने अनेक योजनांचा गाजावाजा करुन फक्त कागदावरच त्या गुंडाळलेल्या असल्याने बेरोजगारांना दारोदार भटकंती करण्याची दरवर्षी वेळ येत असल्याचीही भावना बेरोजगार युवक व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील जवळजवळ ५०० ते ६०० बेरोजगार युवक विविध कंपन्यांच्या कामावर आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इत्यादी राज्यात कामांना गेल्याचे दिसून येत आहे. एखाद्या दुकानासाठी अथवा व्यवसायासाठी बँकेने कर्ज द्यायचे म्हटले तर अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड काम असते व गॅरंटीचा प्रश्नही समोर उभा राहतो. दुकान किंवा व्यवसाय उभारण्यासाठी बेरोजगारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहत असते. शासनस्तरावर काही अटी शिथिल केल्यास बेरोजगारांना सहज कर्ज मिळेल, अशी सोय करून देण्याचीही मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे. मोठ्या पैशाच्या आमिषाला बळी पडून बेरोजगारांचा हिरमोड होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. सुरुवातीला मध्यस्थी करणारा स्थानिक ठेकेदार कंपनीच्या दारापर्यंत दिसतो. नंतर तो ठेकेदार भूमिगत होत असल्याने बेरोजगारांना परराज्यात वालीच उरत नसल्याने जे मिळेल ते खाऊन आपत्तीचा भार सहन करीत त्यांचे आयुष्य जगणे सुरू असते. विशेष म्हणजे, परराज्यात गेलेल्या या बेरोजगारांच्या असहायतेचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापन त्यांच्याकडून अवजड व जादा काम करवून घेत असल्याचीही माहिती आहे. गरजवंत असल्याने हे बेरोजगार याबाबत काहीही बोलत नाही. मजुरी देतानाही त्यात दांडी मारली जाते. बेरोजगारांच्या समस्येकडे शासनाने दुर्लक्ष न करता त्यावर उपाययोजना करून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील बेरोजगार युवक करीत आहेत. अन्यथा दिवसेंदिवस बेरोजगारीच्या भस्मासूर वाढून भयानक रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्योगांचा अभावस्थानिक पातळीवर स्वातंत्र्याची ७० वर्ष पूर्ण होत असतानाही एमआयडीसीची निर्मिती झाली नसल्याने बेरोजगारांना इतर राज्यात कामासाठी जावे लागत असते. ब्रह्मपुरी येथे एमआयडीसीची मागणी जुनी असून फक्त जागा सीमांकित करून फलक लावण्यात आले आहे. परंतु एकही लहान मोठा उद्योग सुरू झाला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून बेरोजगारी वाढली आहे.