शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हरित योजनेमुळे होईल पर्यावरणाचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:27 IST

केंद्र शासन पुरस्कृत अमृत (हरीत) योजनेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरातील विविध प्रभागामध्ये सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या खुल्या जागांवर हरित क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या महानगरातील नागरिकांच्या स्वास्थ्य रक्षणाकरिता उपकारक ठरणार आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : विविध ले-आऊटमध्ये विकासकामांचा शुभारंभ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत अमृत (हरीत) योजनेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरातील विविध प्रभागामध्ये सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या खुल्या जागांवर हरित क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या महानगरातील नागरिकांच्या स्वास्थ्य रक्षणाकरिता उपकारक ठरणार आहे. यामुळे प्रदूषणावरही मात होईल. या योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला चालना मिळणार असल्याने शहरी क्षेत्रातील पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कार्यास हातभार लाभेल, असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.केंद्र पुरस्कृत अमृत हरित योजनेंतर्गत मनपाद्वारा आयोजित जुना चांदाफोर्ट येथील मोकळ्या जागेवर हरित क्षेत्र विकसित कामाचे भूमिपूजन ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, खुशाल बोंडे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, रेल्वेचे वरिष्ठ अभियंता सत्यनारायण, शहर अभियंता महेश बारई, भाजपा मनपा गटनेते वसंता देशमुख, भाजपा जिल्हा महासचिव राहुल सराफ, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, मनपा झोन सभापती देवानंद वाढई, मनपा झोन सभापती आशा आबोजवार, मनपा झोन सभापती रंजना यादव उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी रेल्वे प्रशासनाने या लोकाभिमुख, विकासाभिमुख कार्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देवून सहकार्य केल्याबद्दल रेल्वे अधिकाºयांच्या भूमिकेची प्रशंसा केली. चंद्रपूर महानगर ही गोंड राजाची राजधानी असून ऐतिहासिक भूमी आहे. त्यामुळे या महानगराला नवे स्वरूप प्राप्त करून देण्यात शासकीय अधिकाºयांनी पुढाकार घेतला, ही बाब सुखावह असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. शहरातील शंभर टक्के ले-आऊटचे हरितीकरण करणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगून ना. अहीर यांनी हे काम वेकोलिच्या सीएसआर निधीतून केले जाईल, असे सांगितले. याच योजनेतून दे.गो. तुकूम विभाग १ येथे (ख्रिश्चन हॉस्पीटल रोड) गुरूकूल गृह निर्माण सहकारी संस्था अभिन्यासातील खुल्या जागेवर, विधी महाविद्यालयासमोरील खुल्या जागेवर हरित क्षेत्र विकास कामांचे भूमिपूजन तसेच वेकोलि सीएसआर निधी अंतर्गत महाकुलकर ले-आऊट तुकूम येथील खुल्या जागेवर चैनलिंक कुंपन झाडे लावणे व वेकोलिच्या निधी अंतर्गत तुकूम येथील सर्व्हे क्र. १०४/२८ मधील विकास कामांचे, नगिनाबाग प्रभाग क्र. ९ येथील विश्वकर्मा कॉलनी दाताळा रोड येथे वेकोलि सीएसआर अंतर्गत गोविंदपूर रिठ ले-आऊट मधील खुल्या जागेतील विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.महाकाली मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी १० कोटीलोकमत न्यूज नेटवर्कझरपट नदीचे पठाणपुरा गेटपर्यंत स्वच्छता करणे हे आपले प्राधान्यक्रमावरील कार्य आहे. महाकाली देवी चंद्रपूरचे आराध्य दैवत आहे. राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे महाकाली मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी १० कोटी रूपये उपलब्ध होणार असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी यावेळी दिली. सरकारची धोरणे विकासाभिमुख असल्याने चंद्रपूर या ऐतिहासिक महानगराला सर्वांग सुंदर व विकास समृध्द करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजचा हा कार्यक्रम याच भूमिकेचा भाग असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.