बल्लारपूर : राज्यात राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानअंतर्गत हरित शपथ घेण्याचा उपक्रम नगर परिषद सभागृहात घेण्यात आला.
स्वच्छता विभागाच्या स्वच्छ सर्वेक्षण टीमने रांगोळ्या काढून सजावट केली.
यावेळी सभागृहात मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले की, पर्यावरण विभागाच्या निकषानुसार माझी वसुंधरा अभियानअंतर्गत पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूते तत्त्वावर आधारित पर्यावरण रक्षण मोहीम शासनातर्फे राबविण्यात येत आहे. हरित शपथ देण्याचा मुख्य उद्देश नागरिकांत पर्यावरण याविषयी जनजागृती करणे आहे. यावेळी नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी यांच्यासह कार्यालय अधीक्षक संगीता उमरे, उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, अभिजित मोटघरे, स्वच्छता विभागाचे मंगेश सोनटक्के, तसेच सुजित खामनकर, श्याम परसूटकर, अभिजात मिर्झा, महेश वानखेडे, अभिजित पांडे, मोनिका ढोके, नगरसेवक व इतर सर्व विभागप्रमुख कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. माझी वसुंधरा अभियान १५ जानेवारीपर्यंत चालणार असून या कालावधीमध्ये शहरातील सर्व नागरिकांनी हरित शपथ घेऊन पर्यावरण संरक्षण करण्याचा संकल्प करावा, असे नगर परिषदच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
कॅप्शन : कर्मचाऱ्यांना हरित शपथ देताना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक.