शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नगर पंचायतीसाठी आजी-माजी पालकमंत्री मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत.  मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोणत्या पक्षाला कौल देतो, हे १९ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.

राजेश भाेजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुका रंगतदार होत  आहे. राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. उमेदवार डोअर टु डोअर प्रचारात गुंतले आहेत. आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी निवडणुकीची धुरा आजी-माजी पालकमंत्र्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री विजय वडेट्टीवार तर भाजपकडून माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कंबर कसल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे.सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या सहा नगर पंचायतींची निवडणूक २१ डिसेंबरला होत आहे. ओबीसी प्रवर्ग  रद्द झाल्याने या प्रवर्गाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरित जागांवर आपल्याच पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी स्थानिक पुढारी प्रचारात व्यस्त आहेत. या पुढाऱ्यांना बुस्टर डोस देण्याचे काम जिल्ह्यातील बडे नेते करत आहेत. काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष गेल्या पाच वर्षांचा विचार करता प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री विजय वडेट्टीवार तर भाजपकडून माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत.  मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोणत्या पक्षाला कौल देतो, हे १९ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.

नगर पंचायतीच्या प्रचारात तिजोरीवर चर्चा

- प्रचार सभेत आमदार सुधीर मुनगंटीवार हे राज्यात भाजपची सत्ता असताना घडवून आणलेल्या विकासाचे दाखले देत मते मागत आहे. तर ना. विजय वडेट्टीवार हे आता सरकारची तिजोरी आमच्याकडे आहे. - काँग्रेसकडे सत्ता आल्यास कायापालट करण्याचा शब्द मतदारांना देत आहे.-  राज्यात भाजप सत्तेत असताना सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते. यावरून निवडणुकीत तिजोरी शब्द चांगलाच चर्चेत आहे.

आमदार आणि माजी मंत्रीही प्रचारातजिवती मागास तालुका आहे. तो राजकीयदृष्ट्या मागास असला तरी नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने दखलपात्र असल्याचे दिसून आले. काँग्रेसची धुरा त्यांचे धाकटे बंधू राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे हे सांभाळत आहे. भाजपकडून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनीही येथे सभा घेऊन चुरस निर्माण केली आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार