शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात आजीने केली नवजात नातीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 13:07 IST

आपल्या २७ दिवसांच्या नातीचा आजीनेच गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना जिवती तालुक्यातील सोमलागुडा (मरकलमेटा) गावात गुरुवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देहवा होता वंशाचा दिवाकापसाच्या ढिगाऱ्यात ठेवले दडवून

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वंशाला दिवा हवा, या आकसापोटी आपल्या २७ दिवसांच्या नातीचा आजीनेच गळा आवळून खून केल्याची व नंतर घरातील कापसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवून ठेवल्याची खळबळजनक घटना जिवती तालुक्यातील सोमलागुडा (मरकलमेटा) गावात गुरुवारी उघडकीस आली.सोमलागुडा (मरकलमेटा) येथील रावसाहेब नारायण राठोड यांची २७ दिवसांची मुलगी अन्नपूर्णा ही घरातून बेपत्ता झाली. याची तक्रार ५ नोव्हेंबर रोजी जिवती पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी नवजात बालिकेचा शोध सुरु केला. घराच्या आजुबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु बालिका मिळाली नाही. रात्रभर शोध घेऊनही बालिका न मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे ठाणेदार रविंद्र नाईकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरविली. त्यानंतर आजीवर पोलिसांना संशय आल्याने आजी जनाबाई नारायण राठोड हिला पोलिसी हिसका दाखविताच तिने नातीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. रावसाहेब राठोड यांना अन्नपूर्णाच्या रुपाने तिसरे अपत्य मुलगीच झाले होते. त्यामुळे आजी जनाबाई संतापून होती, अशी माहिती आहे. पोलिसांनी आरोपी जनाबाई नारायण राठोड(६०) यांच्यावर भांदविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा