शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक, पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:52 IST

गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तारसा बूज ग्रामपंचायत येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देतारसा बुज. येथील घटना : घरकूलसाठी पात्र व्यक्तींची नावे डावलली

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तारसा बूज ग्रामपंचायत येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली.तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये घरकूल योजनेसाठी अर्ज मागविले जात आहेत. हे अर्ज मागविल्यानंतर त्या संबंधीची यादी पंचायत समितीमार्फत अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाते. मात्र तारसा बूज येथील ग्रामसेवक हरीहर गुरुनुले यांनी पंतप्रधान आवास योजनेत अंतर्गत घरकूल मिळावे, या मागणीसाठी शेकडो अर्ज आले होते. यातील केवळ २४ अर्ज वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती पुढे आली. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामसेवक गुरूनुले व सरपंच सुनील उराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना चक्क तासभर ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. परिणामी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची मोठी गोची झाली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दारिद्र रेषेखालील गरजू घटकांसाठी शासनाने घरकुलची योजना अंमलात आणली. पण गरजुंना घरकूल मंजूर करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तारसा येथील ग्रामसेवकाने शेकडो अर्जातून केवळ २४ अर्जच वरिष्ठ स्तरावर पाठवले आहेत. दरम्यान, संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन मासिक सभा चालू असताना सचिव व सरपंचांना जाब विचारला. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने समाधानी न झालेल्या गावकऱ्यांनी मासिक सभेतच पदाधिकाऱ्यांना घेराव घातला. मनमर्जीने काम करणाऱ्या ग्रामसेवकासह पदाधिकाऱ्यांना तासभर डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती दीपक सातपुते गावात दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केल्याने गावकरी शांत झाले. परंतु पात्र व्यक्तींना घरकूल मिळणार नसल्याने गावात प्रचंड नाराजी होती. या प्रश्नावर तोडगा शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवडीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत