शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बीडीओला घेराव घालताच डोमाला मिळाला ग्रामसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:05 IST

पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांपासून ग्राम सेवक अतिअल्प काळ सेवेत राहतो. वारंवार ग्रामसेवक बदलत असल्याने गाव विकासापासून वंचित आहे.

ठळक मुद्देपंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांपासून ग्राम सेवक अतिअल्प काळ सेवेत राहतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांपासून ग्राम सेवक अतिअल्प काळ सेवेत राहतो. वारंवार ग्रामसेवक बदलत असल्याने गाव विकासापासून वंचित आहे. त्यामुळे गावकºयांनी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच प्रफुल्ल कोलते यांच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक देऊन बीडीओला घेराव घातला. त्यामुळे ग्रामसेवक कापगते यांचा प्रभारी म्हणून आदेश काढल्याने सदर आंदोलनाला यश आले आहे.ग्रामपंचायत डोमा येथे मागील चार वर्षांत अनेक ग्रामसेवक आले. ते सेवा देत असताना त्याची बदली व्हायची, त्यामुळे वारंवार बदली होत असल्याने ग्रामसेवक येण्यास टाळाटाळ करीत होते. जनतेची कामे होत नव्हती, दरम्यान तीन मासिक सभा, तीन ग्रामसभा ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीत झाल्या. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. जनता त्रस्त होत होती. अखेर भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच प्रफुल्ल कोलते यांचे नेतृत्वात पं.स.कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान ग्रामसेवक मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी बीडीओने दखल घेत, आंदोलनकर्त्यांना बीडीओ कक्षात बोलवून चर्चा केली. दरम्यान डोमा ग्रामपंचायतला प्रभारी ग्रामसेवक म्हणून कापगते यांच्या नावाचा अध्यादेश काढण्यात आला.यावेळी उपसरपंच देवानंद मालके, ग्रा.पं.सदस्य तुळशीराम दोडके, सूरज गायकवाड, देविदास हजारे, शामराव चौधरी, महागू शेलोरे, विलास कुर्वे, संजय किरीमकर, ईश्वर हनवते, मनोज दुर्गपाल, मेघा शेंडे, माधुरी वैध आदी उपस्थित होते.