शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ग्रामगीता प्रत्येक गावाची मार्गदर्शक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:20 PM

ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : जिल्ह्यातील आदर्श ग्राम सेवकांचा सत्कार सोहळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे. त्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार आज करता आला, याचा आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्राम पुरस्कार वितरण सोहळा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांची कार्यशाळा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, गुरुदेव सेवाश्रम पाठसूळ अकोला येथील राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ.उध्दव गाडेकर महाराज, औरगांबाद जिल्हयातील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर थेरे पाटील, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, अर्जना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, रवींद्र मोहिते, ओमप्रकाश यादव आदींची उपस्थिती होती. दुसºया सत्रामध्ये बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेवत काम करण्याचे सांगितले. गावामध्ये सुखसुविधा आणि जीवनावश्यक मुलभूत सुविधा असणे म्हणजे गाव जिवंत असणे होय. आता गावे वाचविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावासंदर्भात निर्णय घेताना गतीशिलपणे योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ ग्रामसेवक नव्हे तर सरपंच, सदस्य व नागरिकांचा सहभाग ग्रामविकासात आवश्यक आहे. सर्वांची साथ मिळते तेव्हा आदर्श गाव घडते. महिला आरक्षणामुळे ५० टक्के महिला सद्या कार्यरत आहेत. त्या उत्तम प्रकारे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पुरस्कार देऊन मूल तालुक्यातील बाबराळा या गावाला सन्मानित करण्यात आले. तर ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी गावाला द्वितीय तर वरोरा तालुक्यातील वंधली या गावाला दोन लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार दिला.यावेळी ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’ या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेचाही पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये चंद्रपूर येथील दादाजी रामचंद्र मोरे, कोरपना तालुक्यातील भुवीगुडा गावाचे विशाल नारायण बोथाडे व्दितीय तर प्रवीण पंढरीनाथ पिसे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.१८ वर्षाखालील स्पर्धेसाठी इशिता प्रदिप धकाते प्रथम, आशिष राहुल नागदेवते द्वितीय, समिक्षा शंकर बावणे तृतीय यांनाही पुरस्कार देण्यात आले. जिल्हास्तरीय लघुपट स्पर्धा बक्षिस वितरण सोहळाही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.कर्मचाऱ्यांनी योजनांची अंमलबजावणी करावी- अहीरयावेळी सकाळच्या सत्रात ना.हंसराज अहीर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो योजना ग्राम विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्राम विकास साध्य करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाºया कर्मचाºयांनी ग्राम विकासाच्या प्रयोगाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.या ग्रामसेवकांचा सन्मानचंद्रपूर पंचायत समितीमधील ग्रामसेवक निलेश डवरे, चिमूर येथील किशोर ढपकस, बल्लारपूरमधील प्रताप ढुमणे, मूल येथील किशोर ठेंगणे, सावलीमधील संदीप सबनवार, नागभीडमधील अजय राऊत, ब्रम्हपुरी येथील प्रवीण तावेडे, भद्रावतीमधील रजनी खामनकर, वरोरा येथील सुशिल शिंदे, सिंदेवाही येथील दिवाकर येरमलवार, राजुरा येथील वर्षा भोयर, गोंडपिपरी येथील आशिष आकनूरवार, कोरपनामधील नितीन नरड, पोंभूर्णामधील प्रकाश रामटेके व जिवती येथील पुंडलिक ठावरे या ग्रामसेवकांचा सत्कार केला.