आता ४ हजार २२१ जागांसाठी निवडणूक होणार असून, यासाठी ११ हजार ३६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे यावेळी प्रचारही हायटेक पद्धतीने झाल्याचे जिल्ह्यात बघायला मिळाले. गावात व्हॉटस्ॲपवर ग्रुप तयार करून याद्वारे विविध प्रचारतंत्राचा वापर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर लहान-लहान व्हिडिओद्वारेही आपण पुढील पाच वर्षांत काय काम करणार हेही पटवून देण्याकडे उमेदवारांचे लक्ष होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून, आता उमेदवार गुप्त पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचणार असून, आपल्यालाच मतदान करण्यासाठी विनंती करणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
-
सरपंच आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, प्रचार तोफा थंडावल्या असून, नागरिकांचे लक्ष आता सरपंच आरक्षणाकडे लागले आहे.