शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत इमारती दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:52 IST

नागभीड परिसरातील आठ ग्रामपंचायतींचा नागभीड नगर परिषदेत समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देनागभीड नगर परिषद : आठ ग्रामपंचायतींचा कारभार आता पालिकेत

आॅनलाईन लोकमतनागभीड : नागभीड परिसरातील आठ ग्रामपंचायतींचा नागभीड नगर परिषदेत समावेश करण्यात आला. ज्या ग्रामपंचायतींचा पालिकेत समावेश करण्यात आला, त्या ग्रामपंचायतींच्या इमारती आता दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे नगर परिषदेने वेळीच याबाबत नियोजन करण्याची गरज आहे.११ एप्रिल २०१५ रोजी नागभीड नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. नगर परिषदेची स्थापना करतेवेळी नागभीड नगर परिषदेच्या निकषात बसत नसल्याने नागभीडच्या नजिक असलेल्या काही गावांचा या नगर परिषदेत समावेश करण्यात आला. यात नवखळा, बाम्हणी, डोंगरगाव, बोथली, चिखलपरसोडी, भिकेश्वर, तुकुम आणि सुलेझरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.नगर परिषद स्थापन होण्यापूर्वी या ग्रामपंचायत इमारतींमधून गावांचा कारभार चालायचा. याच ठिकाणी ग्रामसभांचे आयोजनही व्हायचे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही या ठिकाणी झडायच्या. ग्रामीण राजकारणाचे अस्सल प्रतिबिंब या ठिकाणी दिसायचे. अनेकांच्या विजयाचे उत्सव तसेच कित्येकांच्या पराभवाचे तोंडही या इमारतींनी पाहिले आहे. गेल्या पाऊणे दोन वर्षांपासून या इमारती एखाद्या पाषाणासारख्या उभ्या आहेत. या इमारतीत कोणतीही चहलपहल नाही. काही इमारती तर सतत उघड्या असतात. यामुळे या इमारतीत कोणतीही अनुचित घडू नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने या इमारतींचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्यासाठी विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.नगरसेवकांचे कार्यालय ?बाम्हणी, डोंगरगाव येथील व अन्य ठिकाणच्या या इमारती लाखो रुपये किमंतीच्या आहेत. गेल्या काही वर्षांपुर्वी या इमारतींचे बांधकाम करण्यात आले. कायद्यात बसत असेल तर या इमारतींचा उपयोग नगरसेवकांच्या कार्यालयाकरिता करण्यासाठी करावा. जेणेकरून या इमारतींची देखभाल होईल.या इमारतींमध्ये झोन कार्यालय सुरू करण्याची कल्पना आहे. जेणेकरून नागरिकांना छोट्या कामासाठी नागभीडला यावे लागणार नाही. यासाठी आपण अध्यक्ष व अन्य नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेऊ.- गणेश तर्वेकरउपाध्यक्ष न.प.नागभीडया इमारतींनी गावाचा कारभार पाहिला आहे. लोकांच्या भावना या इमारतींशी जुळल्या आहेत. नगर परिषद प्रशासनाने या इमारतींना अशा बेवारस सोडू नये. या इमारतींचा विधायक कामासाठी वापर करावा.- अमृत शेंडेमाजी सरपंच, बाम्हणी