शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया डगमगला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:23 IST

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची काही दिवसापूर्वी अध्ययन स्तर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये धक्कादायक सत्य समोर आले आहे. चाचणीमध्ये पहिल्या वर्गातील सोडाच पाचवीच्याही अनेक विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे सत्य समाेर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ही चाचणी शिक्षण विभागाने घेतली असून, त्याचा निकालही जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. मात्र, यामध्ये ठरवून दिलेल्या मूल्यमापनापेक्षाही कितीतरी कमी पटीने विद्यार्थी गुणवत्तेत मागे असल्याचे निकालातून दिसून येत  आहे.  पहिली आणि दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचार केला नाही तरी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्गातील  विद्यार्थ्यांना किमान शब्द ओळख, वाचन, लिखान येणे गरजेचे आहे. 

मातृभाषेमध्येही विद्यार्थी मागेघेण्यात आलेल्या चाचणीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीमध्येही विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येते. यामध्ये ११.८ टक्के विद्यार्थ्यांना साध्या अक्षरांची ओळख नाही, तर २२.८ टक्के विद्यार्थ्यांना गोष्ट वाचता येते.२१.९ टक्के विद्यार्थी केवळ शब्दच वाचन करू शकतात तर २२.२ टक्के विद्यार्थ्यांना अक्षराची ओळख आहे.

शिक्षकांमध्ये नाराजीगुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, अनेकवेळा ते चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम आखले जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही चाचणीही घेताना पहिला आणि दुसरा वर्ग वगळून घेणे अपेक्षित होते.  जुलै महिन्यामध्ये शाळा सुरू झाली असताना सप्टेंबरमध्येच चाचणी घेण्याची घाई प्रशासनाने केली. त्यामुळे गुणवत्ता ढासळल्याचे काही गुरुजींचे म्हणणे आहे

इंग्रजीची भीती मात्र कायमचपहिली ते पाचवीपर्यंत घेण्यात आलेल्या अध्ययन स्तर चाचणीमध्ये  विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती असल्याचे दिसून येते. चाचणी घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७५.५६ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दाचा अर्थ, तर ९३.६४ टक्के विद्यार्थ्यांना वाक्याचा अर्थ सांगता येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. केवळ ६.४ टक्केच विद्यार्थ्यांना वाक्याचे वाचन करता येते. १३.७ टक्के विद्यार्थी प्रारंभिक स्तरावरच असल्याचे दिसून येते.

 भाषा विषयात १५ शाळांची प्रगती समाधानकारक   - जिल्ह्यातील एकूण शाळांमध्ये घेतलेल्या चाचणीमध्ये केवळ १५ शाळांची प्रगती काहीशी समानधाकारक आहे. यामध्ये मराठी भाषेतील गोष्ट वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, या १५ शाळांमधील पटसंख्या ही अगदीच कमी आहे. या शाळामध्ये भद्रावतीतील बेलोरा, अगारा, किलोनी, कढोली, गुंजाळा, मोरवा, ब्रह्मपुरी तालुक्यातील गवराळा, पवनपार, कुडेसावली, जिवती तालुक्यातील चिखली बु., मूल तालुक्यातील ताडाळा, चांदापूर (हेटी), पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी तु., सातारा भोसले, राजुरा तालुक्यातील हिरापूर या शाळांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा