शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाच्या गजरात निघणार रातघोडा

By admin | Updated: February 9, 2017 00:40 IST

पावणे चारशे वर्षांचा इतिहास असलेली चिमूर येथील घोडारथ यात्रा जिल्ह्यात नाही तर विदर्भात प्रसिद्ध आहे.

घोडा रथयात्रा उत्सवाला सुरुवात : लाखो भाविक होणार सहभागी, सोमनाथ मंदिर ठरतेय आकर्षणराजकुमार चुनारकर चिमूरपावणे चारशे वर्षांचा इतिहास असलेली चिमूर येथील घोडारथ यात्रा जिल्ह्यात नाही तर विदर्भात प्रसिद्ध आहे. मितीमाघ शुद्ध (वसंत पंचमी) १ फेब्रुवारीला सुरु झालेल्या घोडारथ यात्रेचा रातघोडा प्रसिद्ध आहे. या रात घोड्यासाठी पंचक्राशीतील लाखो भाविक बालाजी महाराजांचे दर्शन घेवून मोठ्या उत्सवाने सहभागी होतात. बुधवारी रात्री १० वाजता ‘गोविंदा... गोविंदा’च्या गजरात शहराच्या मुख्य मार्गाने रात घोड्याची मिरवणूक निघणार आहे.१ फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या घोडायात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. दररोज रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत विनोदुबवा खोड महाराज उमरेड यांचे कीर्तन होत आहे. चिमूरचा घोडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि चंद्रपूर वढा या पुरातन म्हणीनुसार ३९० वर्षापासून सुरु असलेल्या चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडारथयात्रा वसंत पंचमीला सुरु झाली.घोडारथ यात्रेमधील भाविकाच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणे, सर्कस, खेळण्याची दुकाने इतर साहित्याचे दुकान थाटले आहेत. गाव खेड्यातून येणाऱ्या भाविकांना निरनिराळे मनोरंजनाचे केंद्र थाटले आहेत. मितीमाघ शुद्ध जयोदशी गुरुवारी रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत अशा लाकडी घोडारथावरुन श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची घोडारथ यात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत मंदिरासमोर स्थापना होते. या रात्र घोड्यासाठी विदर्भातील व पंचक्रोशीतील जवळपास एक ते दीड लाख भाविक रथयात्रेत हजेरी लावून भक्तीमय वातावरणात गोविंदा ... गोविंदा च्या गजरात भक्त तल्लीन होतात. शनिवारी ११ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत गोपालकाला होवून नवरात्री समाप्ती होणार आहे. ३९० वर्षापासून सरु असलेली घोडारथ यात्रा मोठ्या भक्तीभावाने आजच्या डिजिटल युगातही सुरू आहे.सोमनाथ मंदिर ठरतेय भाविकाचे आकर्षणभाविकांना देशातील इतर मंदिराची माहिती व्हावी म्हणून आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या वतीने नऊ वर्षापासून मंदिराच्या पुढे प्रतिकृती तयार करण्यात येते. सध्या येथे तयार झालेले गुजरात येथील सोमनाथ मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तविदर्भात प्रसिद्ध असलेला घोडारथ यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या शांतता सुव्यवस्थेसाठी चिमूर पोलीस विभागातर्फे १२ अधिकारी, शंभर कर्मचारी,एसआरपी पथक यासह सिव्हील वेशातील गोपनीय कर्मचारची नियुक्ती केली आहे. रातघोडा व काल्याचा दिवसापासून शहरातील मुख्य मार्गाने जड वाहनाना प्रवेश दिल्या जाणार नाही.- दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूरघोडा रथयात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी नियोजित यात्रा मैदानावरील जागेचे सपाटीकरण, यात्रेकरुसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यपथकाची व्यवस्था, अग्निशामन व्यवस्था, विद्युत व्यवस्था व शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.- शिल्पा राचलवार, नगराध्यक्ष