शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शासनाचे ६५ कोटी पाण्यात

By admin | Updated: May 16, 2017 00:36 IST

राज्य सरोवर संवर्धन योनजेअंतर्गत राज्य शासनाने ब्रह्मपुरी नगर परिषदेअंतर्गत कोट तलाव पर्यावरण

विजय वडेट्टीवार : कोट तलाव सौंदर्यीकरणात घोळलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : राज्य सरोवर संवर्धन योनजेअंतर्गत राज्य शासनाने ब्रह्मपुरी नगर परिषदेअंतर्गत कोट तलाव पर्यावरण व सौंदर्यीकरण करणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्यामुळे या कामात खर्च करण्यात आलेले ६५ कोटी रुपये पाण्यात गेले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.आ. वडेट्टीवार म्हणाले की, २०१३-१४ या आर्थिक वर्षात २ कोटी १२ लाख ११ हजार ७२१ रुपये मंजूर करण्यात आले. या कामात महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभागाने आॅगस्ट-२०१२ मध्ये तांत्रिक मंजुरी दिली. या कामाची निविदा ब्रह्मपुरी नगर परिषदेने १५ जानेवारी २०१३ रोजी प्रकाशित केली. त्यानुसार पूजा कन्स्ट्रक्शनशी ६ जून २०१४ रोजी करारनामा करण्यात आला. या करारनाम्यामध्ये अंदाजपत्रकानुसार काम करण्यात यावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही प्रत्यक्ष तलावातील काम व कागदावरील दाखविण्यात आलेल्या कामाचे अवलोकन केल्यास मोठा फरक आहे. गरज नसताना सभोवताल आधी पथदिवे शासनाचे ६५ कोटी रुपये कोट तलावाच्या पाण्यात वाहून गेले आहेत, असाही आरोप आ. वडेट्टीवार यांनी जसंपर्क कार्यालयात बैठकीदरम्यान केला आहे.ब्रह्मपुरी नगर परिषदतंर्गत येत असलेला कोट तलावाचे सौंदर्यीकरण करण्याकरिता पूजा कन्स्ट्रक्शन या कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आले. कामाचे मोजमाप आणि देखरेख करण्याकरिता ले-आऊट रेखांकन स्थापत्य अभियांत्रिकी तांत्रिक सेवा पुरवठादार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती पीएमसीने जेडी असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलन प्रो. इंजि. गोरडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित कंत्राटदाराने नगर परिषदेशी संगनमत करुन केवळ २० ते ३० टक्के काम केले. यामध्ये जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचा गैरववापर करुन शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला आहे. तलावाचे काम पूर्ण न करता चारही बाजूने पथदिवे लावून ६५ कोटी रुपये शासनाचे पाण्यात बुडविले आहे. या सर्व कामाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.