शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

सरकार शेतकºयांच्या पाठीशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:17 AM

आमची सत्ता होती, शेतकरी अशाच अडचणीत होता. तेव्हा ७१ हजार कोटींचे कर्ज सरसकट माफ करून शेतकºयांचे डोके हलके केले. कोणतीही अट लादली नाही.

ठळक मुद्देशरद पवार यांचा घणाघात : राकाँ कार्यकर्ता व शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आमची सत्ता होती, शेतकरी अशाच अडचणीत होता. तेव्हा ७१ हजार कोटींचे कर्ज सरसकट माफ करून शेतकºयांचे डोके हलके केले. कोणतीही अट लादली नाही. मात्र भाजपा सरकारने विविध अटी लादून कर्जमाफी दिली. त्याचा कोणताही लाभ शेतकºयांना झाला नाही. परिणामी तो दररोज आत्महत्या करीत आहे. आपल्या संकटात आपले सरकारच पाठीशी नाही, याची जाणीव शेतकºयाला होत असल्याने तो हे कृत्य नाईलाजाने करीत आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी कार्यकर्ता तथा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आमदार गुलाब गावंडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राकाँचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष शशी देशकर, माजी नगरसेवक संजय वैद्य, सुनील दहेगावकर आदी उपस्थित होते.यावेळी खा. पवार पुढे म्हणाले, मी कृषी मंत्री असताना शेतकरी आत्महत्येचा गांभीर्याने विचार केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत मी यवतमाळला गेलो. आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या घरी जाऊन आत्महत्येची कारणे शोधली. एकच कारण पुढे आले, कर्जबाजारीपणा. त्यानंतर वर्धा, अमरावती असे दौरे करीत दिल्लीला पोहचलो आणि केवळ आठच दिवसात ७१ हजार हजार कोटींचे कर्ज माफ केले. भाजपा सरकारने मात्र कर्जमाफीचा केवळ इश्यू केला. शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा फतवा काढला. म्हणजे ज्या शेतकºयांवर सहा लाखांचे कर्ज असेल, त्याने आधी साडेचार लाख रुपये भरायचे. तेव्हा त्याला दीड लाखांची माफी. शेतकºयांच्या खात्यात साडेचार लाख रुपये असते तर तो कधीच थकित राहिला नसता, असेही पवार म्हणाले.यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, सरकारने आश्वासने अनेक दिली. मात्र तीन वर्ष सत्तेवर बसूनही आश्वासनांची पूर्तता केली नाही. आज देश बिकट परिस्थितीतून जात आहे. मात्र सरकारला त्याचे काही देणेघेणे दिसत नाही. सरकारकडे उद्योजकांसाठी पैसा आहे, समृध्दीसाठी पैसा आहे. मात्र शेतकºयांसाठी पैसा नाही. शेतकºयांचा सातबारा कोरा करू, प्रत्येक शेतकºयाला दहा हजार रुपयांची तातडीची मदत करू, असे सरकारने मोठ्या जोशात सांगितले होते. मात्र तसे काही झालेले नाही. माजी मंत्री रमेश बंग यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला. शेतकºयांच्या सर्व अपेक्षा सरकारने धुळीस मिळविल्या आहेत. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन बंग यांनी यावेळी केले.चंद्रपुरातील कामगार व कष्टकºयांचा प्रश्न गंभीरचंद्रपूर : कोळसा खाणी आणि कारखान्यांमुळे चंद्रपूर हा कामगार आणि कष्टकºयांचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. आजघडीला येथील एकूण उद्योगांपैकी बंद उद्योगांची संख्या अधिक आहे. शेतीला मर्यादा असल्यामुळे ती पर्याय ठरू शकत नाही. राज्यकर्त्यांनी याकडे आताच लक्ष दिले नाही, भविष्यात गंभीर धोका निर्माण होईल, असे परखड मत खा. शरद पवार यांनी आयएमए सभागृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधताना केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, वैद्यकीय, शासकीय कर्मचारी संघटनांसह विविध आघाड्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या. या प्रश्नांना खा. पवार यांनी उत्तरे देत योग्य ठिकाणी या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याचा शब्द दिला. त्यानंतर खुद्द पवार यांनीच जिल्ह्यातील उद्योगांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, बल्लारपूर पेपरमीलमुळे चंद्रपूर जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. या कारखान्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी युनिटचे उद्घाटन आपल्या हस्ते झाले होते. या उद्योगाला २० वर्षे बांबू देण्याचा करार त्या काळात झाला होता. यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळत राहील अशी त्यामागील भूमिका होती. आता या कारखान्याला बांबूचा पुरवठा बंद झाल्यामुळे हे युनिटच बंद पडल्याची खंतही खा. पवार यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योग कच्चा माल मिळत नसल्यामुळे बंद पडलेले आहेत. यामुळे कामगार व कष्टकºयांचा प्रश्न बिकट झाला आहे. जिल्ह्यातील शेती मर्यादीत असल्यामुळे ती पर्यावर ठरू शकत नाही. या उद्योगांना योग्य तो कच्चा माल उपलब्ध करून दिला नाही, तर भविष्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होऊन तरुणपिढी अतिरेकी दिशेने जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. हा गंभीर प्रश्न राज्यकर्त्यांनी आताच योग्यरित्या हाताळावा, यासाठी आपण स्वत: राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याची ग्वाहीही खा. पवार यांनी यावेळी दिली.अजूनही लोक मलाच मुख्यमंत्री समजतातमी आता राज्यकर्ता राहिलेलो नाही. लोक विसरायला तयार नाहीत. लोक अजूनही मलाच मुख्यमंत्री समजतात. मी विरोधी पक्षात आहे, असा टोला मारताच हशा पिकला. विरोधकांच्या भूमिकेतून विविध घटकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, असे ते संवाद कार्यक्रमात म्हणाले.