शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

शासकीय आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: September 24, 2014 23:27 IST

सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे.

राजुरा : सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा स्थितीत सामान्य नागरिक विविध समस्या व अडचणीत सापडले आहे.सध्या मध्येच थोडाफार पाऊस पडतो आणि काही क्षणासाठी वातावरण थंड करुन जातो. त्यानंतर बेपत्ता होवून सूर्य आग ओकतो, त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढून सर्वत्र आजाराची साथ सुरु आहे. प्रत्येक गाव आजारात सापडले आहे. घरोघरी रुग्ण तडफडत आहे. सरकारी रुग्णालय फूल आहे. तसेच खाजगी दवाखाने सुद्धा हाऊस फूल झाले आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाची आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ मलेरियाची टेस्ट केली जाते. परंतु रिपोर्ट दिला जात नाही. निगेटीव्ह आहे असे सांगितले जाते. डेंग्युची तपासणी होत नसल्यामुळे डेंग्यु सदृश्य ताप असलेल्या रुग्णांवर मलेरियाचे उपचार केले जात आहे. या प्रकारामुळे रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यावर ‘रेफर टू चंद्रपूर’ केले जाते. बऱ्याच वेळेस काही वैद्यकीय अधिकारी रेफर करुन घरी आराम करतात. त्यांच्या रेफर प्रकारामुळे खाजगी व बोगस डॉक्टराचे फावत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी दवाखाना उघडून रुग्णावर औषोधोपचार सुरु केले आहे. घरोघरी जावून उपचार करीत आहे. त्यांना रक्त तपासणीची गरज नाही. सखोल ज्ञान असल्याप्रमाणे रुग्णास पाहून थातूरमातूर उपचार करतात. रुग्ण बरा झाला की, विश्वास बसतो. आणि कमी खर्चात योग्य उपचार म्हणून त्यांची ख्याती होते. परंतु रुग्ण बरा झाला नाही तर त्याच्या बांधलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. तेथे मात्र मागचे पुढेचे सर्व वसुल केले जाते. रुग्णांचा रक्त तपासणी हा एक पॅथॉलाजीचा मोठा व्यवसाय झाला आहे. शासकीय रुग्णालयातील पॅथॉलाजीच्या रिपोर्टवर रुग्णांचा विश्वास नाही. खासगी डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी आपल्या मर्जीच्या पॅथालाजी निवडल्या आहे. तेथे रुग्णास पाठविले जाते. त्यामध्ये दोघांचेही हित साधले असते. रुग्ण बरा झाल्यावर बिल पाहून नातेवाईकाचे ब्लडप्रेशर वाढत आहे. सध्या निसर्गाच्या प्रकोपामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून विविध आजाराची साथ वाढली आहे. यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)