शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानामार्फत शासन जनतेच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात.

ठळक मुद्देसंजय धोटे : देवाड्यात महाराजस्व अभियान योजनेला सुरुवात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शासनाचा मुळ उद्देश सार्थ होत नाही. त्यामुळे शासनाने आता प्रशासनाच जनतेच्या दारात नेण्याचा व ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराजस्व अभियानामार्फत प्रशासनाला जनतेच्या दारात आणले असून जनतेने या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.राजुरा तालुक्यातील देवाडा येथे महसूल विभागाद्वारे महाराजस्व विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, सरपंच लक्ष्मीबाई पंधरे, नायब तहसीलदार बन्सोड, आईदलवार, भाजपा महामंत्री दिलीप वांढरे, वामनराव तुरानकर, उपसरपंच अब्दुल जावेद, मंजुषा अनमुलवार, ईश्वर मुंडे, शिवा बोकुर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार धोटे पुढे म्हणाले, नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराजस्व अभियान ही महत्त्वाकांशी योजना सुरु केली. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे, अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जनतेच्या सोईकरिता योजनेच्या अर्जामध्ये सुटसुटीकरण केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जनतेने कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, याबाबतचे अर्ज स्वीकारून तात्काळ निर्णय घेण्यात आल. त्यानंतर आ. अ‍ॅड संजय धोटे यांच्या हस्ते शेतकºयांना सातबाराचे वितरण करण्यात आले. संचालन श्रीनिवास मंथनवार यांनी केले.