शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोवरीवासीयांनी तिसऱ्यांदा रोखला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.  मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे  धुळीचा त्रास सुरू झाल्याने  ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन  केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली.  तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : बल्लारपूर  वेकोलीअंतर्गत गोवरी डीप कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी २ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले होते. तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.  मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे  धुळीचा त्रास सुरू झाल्याने  ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन  केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली.  तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.गावकऱ्यांना दिलेले आश्वासन वेकोली अधिकाऱ्याने पाळले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भास्कर जूनघरी, विकास पिंपळकर यांच्या नेतृत्त्वातील गावकऱ्यांनी चक्का जाम केले. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चक्का जाम आंदोलनात वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य रस्त्यावर पाणी मारण्याचे  लेखी आश्वासन दिले. चौकात सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांपासून टँकरने पाणी मारणे बंद आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा गावकऱ्यांनी कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यानंतर समस्या सोडविण्याचे आश्वासन वेकोली अधिकाऱ्यांनी दिले. वेकोलीने या मार्गावर चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून कोळसा वाहतूक होऊ दिली जाणार नाही, असा इशारा भास्कर जूनघरी यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिलेला आहे.

या समस्यांनी नागरिक वैतागलेरस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सिक्युरिटी गार्डचा पत्ता नाही. धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र, वेकोलीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. रस्त्याच्या कडेला झुडपे जंगले वाढलेली आहेत. त्यामुळे वळणावरून येताना समोरचे नागरिक दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गोवरी, पोवनी, साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजलेले आहेत. रस्त्यावर प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत. 

 

टॅग्स :agitationआंदोलन