शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द, आसोलामेंढाचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:35 IST

मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे शासनाचा निर्णय । खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे. यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.या अनुषंगाने आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग सावलीचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनवणे यांनी पत्रकाद्वारे लाभधारकांना व पाणीवापर संस्थांना माहिती दिली आहे. पावसाला विलंब होत असून रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन खरीप हंगामाकरिता आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र. २ या कार्यालयाने आसोलामेंढा धरणात उपलब्ध पाण्याच्या साठ्यानुसार व शेतकºयांच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.१ जुलै ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी मिळविण्याकरिता संस्थेच्या लाभधारकांनी त्यांची पाण्याची मागणी अर्ज संबंधित पाणीवापर संस्थेकडे सादर करावे, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.सूर्याचे आग ओकणे सुरूचमार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. दोन-चार दिवसांचा अपवाद सोडला तर जूनच्या १५ तारखेपर्यंत सूर्याचे हे आग ओकणे सुरूच आहे. सातत्याने पारा ४५-४६ अंशापार जात असल्याने जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. पाण्याची पातळीही खालावली आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी दिलासा देणारा मान्सूनपूर्व पाऊसही यंदा आला नाही. त्यामुळे खरीप हंगामच अडचणीत आला आहे. मात्र आता गोसेखुर्द व आसालामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी देण्यात येणार असल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प