आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : उत्तम मार्केटिंगच बचत गटांना बळकटी देऊ शकते. त्यामुळे अशा मार्केटींग व्यवस्थेसाठी आपण पूर्णत: मदत करणार, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.शेती, शेतकरी, शेतमालाची विक्री, शेतीचे तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, शेतीतील जलव्यवस्थापन, अशा विविध आघाड्यांवर मार्गदर्शन आणि या व्यवसायाशी नाळ जुळलेल्या बचत गटांच्या प्रदर्शन व विक्रीचा गेल्या पाच दिवसांच्या सोहळयाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता चांदा क्लब मैदानावर झाला. यावेळी ते बोलत होते.चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वेगवेगळया विभागांच्या कृषी संबंधित उपक्रमांना जोडून जल, जमीन, जंगलशी संबंधित योजना, उपक्रम एकत्रित मांडण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षी विक्रमी ४१ लाख ४६ हजार रुपयांची विक्री या विक्री व प्रदर्शनातून झाली आहे. यामध्ये बचत गटांच्या विक्रीचा आकडा २२ लाखांवर असून शेतीमधील उत्पादनाचा विक्री आकडा १९.४६ लाख आहे. या ठिकाणी विविध यंत्रणेसोबत मोठया प्रमाणात खरेदी विक्रीचे परस्पर करार झाले.यावेळी ना. हंसराज अहीर यांनी बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूमागील कौशल्य जाणून घेतले. अनेकांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वेगवेगळया विभागांच्या शेतीसंबंधित उपक्रमांना एकत्रित आणत एक मोठा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये संयुक्तरित्या राबविल्याबद्दल अधिकाºयांचे कौतुक केले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवींद्र शिवदास, उपमहापौर अनिल फुलझले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ए. हसनाबादे, उपसंचालक रवींद्र मनोहर, अशोक मगर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन देशमुख उपस्थित होते.
उत्तम मार्केटिंग देणार बचत गटांना बळकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:02 IST
उत्तम मार्केटिंगच बचत गटांना बळकटी देऊ शकते. त्यामुळे अशा मार्केटींग व्यवस्थेसाठी आपण पूर्णत: मदत करणार, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
उत्तम मार्केटिंग देणार बचत गटांना बळकटी
ठळक मुद्देहंसराज अहीर : कृषी मेळाव्यातून ४२ लाखांची उलाढाल