शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मेहुलच्या फिरकीने गोंदिया जिल्हा संघांची विकेट

By परिमल डोहणे | Updated: April 28, 2023 21:23 IST

मेहुलनेच पटकावल्या दहाही विकेट : आंतरजिल्हा क्रिकेट टुर्नामेंट

चंद्रपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे चंद्रपुरातील युथ क्रिकेट अकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या आंतरजिल्हा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये चंद्रपूर संघातील मेहुल शेगमवार (२५) या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाने संपूर्ण दहाच्या दहा विकेट पटकावत गोंदिया संघाला केवळ ७६ रनावर ऑल आउट केले. त्याच्या या कामगिरीने चंद्रपूर संघ दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. मेहुलच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रपूर येथील आंतरजिल्हा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक येथील संघ सहभागी झाले आहे. गुरुवारपासून युथ क्रिकेट अकॅडमी मैदानावर ८०-८० षटकांचे सामने आयोजित केले आहेत. परंतु, गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने शुक्रवारपासून चंद्रपूर व गोंदिया या दोन संघातील सामन्याने झाली. चंद्रपूरच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोंदिया संघ केवळ १५ षटकात ७६ रन बनवत ऑलआउट झाले. यात एकट्या मेहुलने गोंदिया संघाचे दहाही गडी पटकावले. मेहुलने सात षटकांत २२ रन देत १० विकेट पटकावल्या. यात चार ओव्हर मेडन टाकले. तर चंद्रपूर संघाने नऊ विकेटवर १५७ रन काढून डाव घोषित केला. तर दुसऱ्या डावात गोंदियाने सात विकेटवर १८६ रन काढले. यामध्ये मेहुलने चार विकेट पटकावल्या होत्या. त्याच्या या कामगिरीने चंद्रपूर संघ विजयी झाला. मेहुलच्या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.बॉक्स

मेहुलने बालपणापासून जोपासला क्रिकेटचा छंदमेहुल हा मायनिंग फायर इंजिनिअरचा विद्यार्थी आहे. वडिलाच्या निधनानंतर आईनेच त्याचा सांभाळ केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून तो क्रिकेट खेळायला लागला. युथ क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षक शैलेश भोयर यांच्या नेतृत्वात तसेच व्हॉईट ॲश क्रिकेट ॲकाडमीमध्ये त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. त्याच्या गोलंदाजीपुढे चांगले बल्लेबाजही टिकाव धरू शकत नाही.

मी नियमित क्रिकेटचा सराव करतो. वडिलांच्या निधनानंतर अडचणी येत होत्या. मात्र चंद्रपूर येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे यांनी आपणाला मदतीचा हात दिला. तसेच क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला. त्यांच्या सहकार्याने आज इथपर्यंत पोहोचलो आहे. पुन्हा चांगली कामगिरी करत. चंद्रपूर संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा मानस आहे.

-मेहुल शेगमवार, चंद्रपूर