लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका दाम्पत्याला मारहाण आणि खंडणीची तक्रार करणाºया इसमाची हत्या झाल्यापासून जलनगरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे. या भागात पुन्हा कोणतीही अनुचित घटना घडू नये, ही खबरदारी म्हणून २४ तास पोलिसांचा खडा पहारा आहे. बुधवारी रात्री १२ वाजता लोकमत चमूने या भागाची पाहणी केली असता, येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दंगा नियंत्रक पथकासह पोलीस डोळ्यात तेल टाकून पहारा देत असल्याचे बघायला मिळाले.१९ जुलै रोजी हुमायू अली व सुमित कांबळे यांच्यामध्ये सांडण्याच्या वादातून भांडण झाले होते. दोन दिवसांनी हुमायू कांबळे यांच्या घराकडे जात असताना पुन्हा वाद उफाळून आला. कांबळे दाम्पत्याला जबर मारहाण झाली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी झाल्या. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. अशातच नरसिंहा चट्टे यांनी तीन इराणी लोकांविरुद्ध खंडणीची तक्रार केली. अशातच दुसºया दिवशी नरसिंहा चट्टे यांची हत्या झाल्याने तणावर चांगलाच वाढला. जलगरातील नागरिकांनी इराणी लोकांची वस्ती उठविण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाºयांच्या आश्वासनानंतर नरसिंहा चट्टे यांचा मृतदेह नागरिकांना ताब्यात घेतला. या घटनेपासून या भागात अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने पोलीस प्रशासन या वस्तीत २४ तास पहारा देत असल्याचे बघायला मिळाला.
जलगरात पोलिसांचा २४ तास खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:55 IST
एका दाम्पत्याला मारहाण आणि खंडणीची तक्रार करणाºया इसमाची हत्या झाल्यापासून जलनगरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे.
जलगरात पोलिसांचा २४ तास खडा पहारा
ठळक मुद्देतणावपूर्ण शांतता : जलनगर पोलिसांसाठी संवेदनशील