शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील २१ विद्यार्थ्यांना थायलंडचा गोल्डन इथिक्स पुरस्कार

By परिमल डोहणे | Updated: June 30, 2023 22:58 IST

९ जुलै रोजी होणार वितरण समारंभ

चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय इथिक्स क्लब थायलंड, अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट विभागीय कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इथिक्स स्पर्धा परीक्षेमध्ये चंद्रपुरातील २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात बल्लारपूर पब्लिक स्कूल येथील कनक विनोद मून व विद्या विहार स्कूलमधील ग्रंथा वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मागील तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय इथिक्स क्लब थायलंडच्या वतीने इथिक्स स्पर्धा घेण्यात येते. यंदा पहिल्यांदाच विकास तायडे, अमित वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चंद्रपुरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंद्रपुरातील तब्बल २१ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ९ जुलै रोजी सेंट मायकल्स इंग्लिश स्कूल थायलंडचे भदंत किराती, यांच्या हस्ते सिस्टर अंजली थायलंड, मिथिला चौधरी बांग्लादेश, सभुज बरुवा, बांग्लादेश, यांच्या प्रमुख उपस्थितीत, बृजेशकुमार पझारे यांचा अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या २१ विद्यार्थ्यांना ग्लोडन इथिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे विकास तायडे यांनी कळविले आहे.हे आहेत विजेते

ग्रुप ‘ए’ मध्ये प्रथम ग्रंथा ए. वाघमारे, द्वितीय विनय विनोद थुल, तृतीय स्वीकृती सुभाष पुनेकर, चतुर्थ जमन्ना प्रशांत वासाडे, पाचवा देवश्री लांजेकर, सहावा खुशबू कोटांगले, सातवा तृष्णा सुनील मोनगरकर, आठवा क्रमांक अभिलाषा बगडे, नववा कृषाली सुरेंद्र चौथाले, दहावा क्रमांक हिनेश्वरी गोपाल पिपरे, तर ‘ब’ गटामध्ये प्रथम कनक विनोद मून, द्वितीय सिद्धांत थमके, तृतीय ऋतुजा नानाजी धोडरे, चतुर्थ मोनाली सतीश खांडरे, पाचवा निकीत धम्माजी मोरे, सहावा साची मेश्राम, सातवा अयंती महेश मुत्यलवार, आठवा रवी दिलीप उरकुडे, नववा तृप्ती श्रीकृष्णा बुरांडे, दहावा क्रमांक तन्वी खाडिलकर यांनी पटकावला असून यांना सन्मानित करण्यात येणार आहे.