शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखूर्दच्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देअशोक नेते : शेतकरी व अधिकाऱ्यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या गोसीखूर्द प्रकल्पाच्या कालव्यांचे काम मोठया प्रमाणात सुरु आहेत. त्या कालव्यांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना वेगवेगळया गावांना वेगवेगळे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहे. या कालव्यांसाठी जमिनी देण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे आज त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. तेव्हा प्रत्येक गावातील खरेदी, विक्रीचे दर वेगवेगळे असून त्या खरेदी विक्रीच्या आधारावर दर निश्चित केलेले आहेत. त्यामुळे अशी तफावत दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचे एकच दर देण्यात येवून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. तेव्हा या दोन्ही मागण्यांचा विचार करुन त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न देता शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे ज्या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत, अशा बँकावर कडक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. ज्यांनी आॅफलाईनव्दारे कर्जमाफीचे अर्ज केलेले आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पAshok Neteअशोक नेते