शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वेकालि खाण प्रभावित गावांना सीएसआर निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:27 IST

कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे, ही बाब सामाजिक दायित्वाचा अविभाज्य भाग आहे. अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, आरोग्य सुविधा, शिक्षण, भूमीहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर तो कर्तव्याचा भाग आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : साखरी गावात तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे, ही बाब सामाजिक दायित्वाचा अविभाज्य भाग आहे. अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, आरोग्य सुविधा, शिक्षण, भूमीहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर तो कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे खाण प्रभावित सर्व गावांना न्याय देण्यासाठी भरघोस सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाºयांना दिले.वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत राजुरा तालुक्यातील साखरी गावात तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण कामाचे व येथील नळ योजनेचा प्रारंभ ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. अ‍ॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, बल्लारपूर वेकोलि क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक सिंग, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, जिल्हा किसान आघाडीचे सरचिटणीस राजू घरोटे, जि.प. सदस्य सुनील उरकुडे, सरपंच भाऊजी कोडापे, काशिनाथ गोरे, मनोहर पोडे, मोतीराम गोरे, धर्मराव उरकुडे, सुरेश पोडे, किसन कावडे, रामचंद्र कावडे, संजय गोरे, सुरेखा गोरे, हरिदास बोबडे आदी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणाºया मोबदल्यात एक रूपयाही कमी होवू देणार नाही, असा पुनरूच्चार केला. वेकोलिने सामाजिक दायित्व निधीतून तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण कामासाठी १९ लाख रूपये व ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजनेकरिता ४० लाख रूपये उपलब्ध करून दिले. क्षेत्रिय महाप्रबंधक सिंग यांनी वेकोलि प्रबंधनाद्वारे विकास विषयक आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातून घेतला.कार्यक्रमात १५ लाभार्थी महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत ना. अहीर, आ. संजय धोटे व गॅस एजन्सीचे प्रबंधक वाघुजी गेडाम यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर