संजय धिवरे : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावाचंद्रपूर : जिल्ह्यातील अनाथ बालकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी केले. जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या सभेमध्ये ते बोलत होते. एचआयव्हीसह जगणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविण्यास जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांंनी घेतला. सभेला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.यु.व्ही.मुनघाटे, मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.सोयाम, जिल्हा आर.सी.एच अधिकारी डॉ.संदीप गेडाम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन.एच.एम. मुळावार, जिल्हा परविक्षा अधिकारी टी.व्ही. पौनिकार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पांनगंटीवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दासटवार यांच्यासह जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकचे कर्मचारी व विविध संस्थेचे व्यवस्थापक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अनाथ बालकांना योजनांचा लाभ द्या
By admin | Updated: October 21, 2015 01:01 IST