शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाला लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:35 IST

राज्य शासन अनेक योजना आखत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. लाभाच्या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लाभार्थ्यांचा शोध घेणे, शेवटच्या टोकाला असणाऱ्या नागरिकांना योजनांची माहिती व लाभ देण्याचे निर्देश आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दिले.

ठळक मुद्देसंजय धोटे यांचे निर्देश : चंद्रपुरात लघुगटाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासन अनेक योजना आखत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. लाभाच्या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लाभार्थ्यांचा शोध घेणे, शेवटच्या टोकाला असणाऱ्या नागरिकांना योजनांची माहिती व लाभ देण्याचे निर्देश आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दिले.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत येणाºया सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना या संदर्भातील प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक नियोजन भवनात गुरूवारी पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विकासाच्या पुढील वर्षीच्या विभागनिहाय तरतूदी, मागणी व नियोजनावर चर्चा करण्यात आली.बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, चिमूरचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बावनकर, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी जिल्हा वार्षिक योजनांमधील निधीतून कायमस्वरुपी पायाभूत सुविधा उभ्या राहत असतील तर त्या दीर्घकाल टिकून राहतील, असे नियोजन करण्याचे आवाहन केले. पर्यटन, क्रीडा, प्रसिध्दी या माध्यमातून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करावे, शिक्षण, आरोग्य याबाबतचे प्रस्ताव तातडीने पूर्ण करुन ग्रामीण भागातील मूलभूत गरजांना पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.यासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आढावा घेणार आहेत. त्यापूर्वी तयारी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक अधिकाºयांची उपस्थिती होती.