शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना बस बाहेर काढले

By admin | Updated: August 7, 2016 00:46 IST

येथून जवळच असलेल्या पुरड बसबस्थानकावर लहान विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बस बाहेर काढण्यात आले. ...

धक्काबुक्की : चालक-वाहकाविरोधात पोलिसांत तक्रारघुग्घुस : येथून जवळच असलेल्या पुरड बसबस्थानकावर लहान विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बस बाहेर काढण्यात आले. विद्यार्थिनींसोबत झालेल्या प्रकारामुळे संतप्त होऊन पालकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.खेड्यापाड्यात राहणारा प्रत्येकजण शिक्षणाच्या प्रवाहात यावा, या हेतूने राज्य शासनाने विद्यार्थ्यांकरिता मानव मिशनअंतर्गत एस.टी. बसेस उपलब्ध केल्या आहेत. परंतु अवेळी धावणाऱ्या एस. टीे. बसेसमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सत्र सुरू होऊनही शाळा संपल्यानंतर नायगाव येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने कोणत्याही भौतिका सुविधा नसलेल्या घुग्घुस बसस्थानकावर विद्यार्थिनींना रात्री ७.३० वाजेपर्यंत बसची वाट पाहत राहावे लागते. त्यामुळे त्यांना घरी जाण्यास रात्री ९ वाजतात. नायगावला जाण्याकरिता बस उपलब्ध करून द्यावी म्हणून आगार व्यवस्थापक, पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींना निवेदने दिलीत. परंतु काहीही उपयोग झाला नाही. वाहक व चालकाने धक्काबुक्की करून दूरवर विद्यार्थिनींना उतरवून दिल्याने संताप व्यक्त केला जात असून गावाला जाण्याकरिता बस उपलब्ध न झाल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थिनी सोनाली झाडे, यशश्री हरणे, अंजू बोबडे, दीक्षा मिलमिले, कोमल बोकडे यानी दिला आहे. तसेच उसगावच्या विद्यार्थिनींना सकाळी शाळेत जाण्यासाठी एकमेव बस उपलब्ध असून परतीचा प्रवास करताना सायंकाळी ५.३० वाजता बस उपलब्ध नाही. त्यामुळे त्या विद्यार्थिनींना परतीच्या बसची प्रतीक्षा आहे. उसगावसाठी सायंकाळी ५.३० वाजता घुग्घुसवरुन बस उपलब्ध करावी अशी मागणी उसगावच्या सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)घडलेला घटनाक्रम संतापजनक३० जुलैला सकाळ पाळीतील विद्यार्थिनी एमएच ४०एन ८७९७ क्रमांकाच्या बसने शाळा आटोपून नायगावला परत जात असताना वाहकाने विद्यार्थिनींना बेल्लारा फाट्यावर उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यावर विद्यार्थिनींनी नकार देताच चालक-वाहकाने पाच किमी पुढील पुरड बसस्थानकावर बस थांबवून आत बसलेल्या विद्यार्थिनींना धक्काबुक्की करून खाली उतरविले.