बल्लारपूर : आजची तरुण पिढी सर्व बाबतीत आकाशाला गवसणी घालण्याची मानसिकता बाळगून आहे. त्यांना दिशा देण्याची गरज आहे. यात प्रशिक्षण शिबिर महत्त्वाची भूमिका बजावत असून मुलींनी नव्या सामर्थ्यांच्या शोध घ्यावा, असे आवाहन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. हरिश गेडाम यांनी कळमना येथील प्रबोधन शिबिरादरम्यान मार्गदर्शनातून केले.बल्लारपूर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने कळमना येथील ग्रामपंचायत कार्यालयात किशोरी मुलींचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा कुंटलावार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.हरिश गेडाम, अॅड. मेघा भाले, बल्लारपूर पंचाययत समितीच्या माजी उपसभापती सुमन लोहे, डॉ. विवेक लांजेकर, वर्षा रामेटेके, ग्राम पंचायत सदस्य छाया तलांडे, वैशाली दुधाने, सविता भुते यांची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, किशोरवयीन मुलींची शारिरीक व मानसिक वाढ होताना काहीसे दडपण येते. मात्र योग्य वेळी वैद्यकीय सल्ला मिळाल्यास त्यांच्यातील दडपण कमी होते. यावेळी आईलाच मैत्रिणीची भूमिका पार पाडावी लागते. दरम्यान अॅड. मेघा भाले यांनी कायदेविषयक, डॉ. विवेक लांजेकर यांनी वैद्यकीय उपचार यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सरीता भुते यांनी तर आभार वैशाली दुधाने यांनी मानले. अंगणवाडी कार्यकर्त्यां, मदतनिस व मुलींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
मुलींनी नव्या सामर्थ्यांचा शोध घ्यावा
By admin | Updated: March 15, 2015 00:58 IST