शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणींमध्ये विद्यार्थिनींनाही होता येणार मायनिंग अभियंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 20:56 IST

२०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनिंग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे यंदापासून मायनिंग पदविका अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संधी मिळताच महिला जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतानाही अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अखत्यारित संस्थांमधील मायनिंग पदविका अभ्यासक्रमाला आजपर्यंत प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, २०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनिंग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात मंगळवारी परिपत्रक जारी केल्याने राज्यातील हजारो विद्यार्थिनींच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले आहेत.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची स्थापना झाल्यापासून अखत्यारित तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मायनिंग, मायनिंग सर्व्हे, मायनिंग इंजिनिअरींग अभ्यासक्रम शिकविले जातात. मात्र, पदविका व पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात प्रवेशाचे मार्ग विद्यार्थिनींसाठी बंद ठेवण्यात आले होते. मायनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेकोलि खाणींमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे मायनिंग पदवी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. या अभ्याक्रमतंर्गत विविध कोळसा व तत्सम खाणींमध्ये क्षेत्रकार्य करावे लागते. हे क्षेत्रकार्य अत्यंत खडतर असल्याचा तर्क लावून विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, विद्यार्थिनींना मायनिंग अभियंता होण्याच्या स्वप्नांना मुरळ घालावी लागत होती.'फिमेल कॅन्डेड आर नॉट इलिजीबल' अट वगळली२०२०-२१ शैक्षणिक सत्रातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तिकेतील ४-सी जनरल नोटमधील मुद्दा क्रमांक ३ नुसार फिमेल कॅन्डेड आर नॉट इलिजीबल फॉर ऍडमिशन टू मायनिंग अँड  माईन सर्वे, मायनिंग इंजिनिअरींग कोर्स असे नमुद करण्यात आले होते. मात्र, हा उल्लेख रद्द करून महिला उमेदवारांना मायनिंग व तत्सम अभ्यासक्रमासाठी पात्र असल्याचे परिपत्रक राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.बीआयटीच्या प्रयत्नांची फलश्रुतीचंद्रपूर जिल्हा कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. वेकोलिमुळे दरवर्षी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, मायनिंग पदविकेसाठी विद्यार्थिनींना प्रवेश नसल्याने बल्लारपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी (बीआयटी) बामणीचे संस्थाध्यक्ष अँड. बाबासाहेब वासाडे, संचालक संजय वासाडे, प्राचार्य श्रीकांत गोजे यांनी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यार्थिनींना या सत्रापासून मायनिंग पदविकेला प्रवेश मिळणे ही बीआयटीच्या प्रयत्नांचीच फलश्रुती होय.प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमायनिंग पदविका प्रवेशासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या अभ्यासक्रमाला प्रथमच विद्यार्थिनींनी प्रवेश देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे प्रवेश घेण्याकरिता २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मायनिंग व तत्सम पदविका प्रवेशासाठी महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अखत्यारित सर्व संस्थांना या शैक्षणिक सत्रापासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे.-डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र