शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी पर्यटन बंदच; नागपूरच्या कार्यालयाकडून परवानगी देण्यासाठी विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:02 IST

चार महिन्यांपासून घोडाझरी पर्यटन बंदच: पर्यटक आल्यापावलीच जाताहेत परत

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : एका दिवसाच्या पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेले घोडाझरी पर्यटनस्थळ गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. सिंदेवाही येथील कार्यालयाचा निविदेच्या परवानगीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, नागपूरच्या कार्यालयाकडून परवानगी देण्यासाठी कमालीचा विलंब होत आहे. 

या भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाचे बांधकाम सुरू केले आणि तलावाचे हे बांधकाम १९२३ ला पूर्ण झाले. तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि एका बाजूला कृत्रिम बांध असे या तलावाचे स्वरूप आहे. 

सिंचनासोबतच या तलावाचा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. नव्हे तर गेल्या काही वर्षात हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणूनच प्रसिद्धीस आले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील पर्यटक या पर्यटनस्थळास वर्षभर भेट देत असतात. पूर्वी शासनाच्या पाटबंधारे विभागाकडे या पर्यटनस्थळाचे संचालन होते. मात्र, काही वर्षांपूर्वी शासनाने हे पर्यटनस्थळ खासगी व्यवस्थापनास भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. या व्यवस्थापनाने याठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने ज्या काही सोयी आवश्यक आहेत, त्या विविध सोयी उपलब्ध करून हे पर्यटनस्थळ चांगलेच नावारूपास आणले. म्हणूनच पूर्व विदर्भातील पर्यटक, शाळा महाविद्यालयांच्या सहली घोडाझरी येथे एका दिवसाच्या पर्यटनासाठी येत असत. 

आता या व्यवस्थापनाची "लीज" संपल्याने गेल्या चार महिन्यांपासून घोडाझरी पर्यटनस्थळ बंद आहे. लीज संपताच या पर्यटनस्थळाची नव्याने निविदा काढण्यासाठी नागपूर येथील मुख्य अभियंता यांच्याकडे परवानगी मागितली आणि या परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, नागपूरचे कार्यालय परवानगी का देत नाही, हे एक कोडेच आहे. 

अभयारण्याचेही भिजत घोंगडे महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी घोडाझरी अभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड, तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३.८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले. मात्र, अभयारण्याच्या दृष्टीने येथे कोणत्याही सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.

पर्यटकांचा हिरमोडगेल्या चार महिन्यांपासून घोडाझरी पर्यटनस्थळ बंद असल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. अनेक पर्यटकांना घोडाझरी बंद असल्याची माहिती नसल्याने पर्यटकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.

"जुन्या व्यवस्थापनाची लीज संपल्यानंतर नवीन निविदेच्या परवानगीसाठी आमच्या कार्यालयाकडून नागपूरच्या मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, नागपूरच्या कार्यालयाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे निविदा काढता येत नाही." - दिलीप मदनकर, अभियंता, घोडाझरी 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरtourismपर्यटन