महिलांचा सहभाग : १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्पसावली : वीज बिलाचा भरणा केला नसल्याने गेल्या १० दिवसांपासून टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे सावलीसह १० गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी सोमवारी नगरपंचायतीवर घागरमोर्चा काढण्यात आला. शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना २००८ रोजी कार्यान्वित करण्यात आली. योजनेत सावलीसह १० गावांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, या विभागाने पाणीपट्टी वसुली केलीच नाही. त्यामुळे वीजबिलाचा भरणा करण्यात आलेला नाही. वारंवार सांगितल्यावरही वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद केला. परिणामी गेल्या १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावकऱ्यांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला. प्रमोद गेडाम यांच्या नेतृत्त्वात मोर्चा निघाला. माजी सरपंच अतुल लेनगुरे, रवी डोहणे, जयप्रकाश दुधे, राणीताई मोटघरे यांच्यासह शेकडो महिलांचा समावेश होता. पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासह अन्य १६ मागण्यांसाठी मोर्चा निघाला. निवेदन नगराध्यक्षासह मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)पाणीपट्टी भरुन सहकार्य करावेनगरपंचायतीत सत्तेवर येऊन ११ महिने झाले. पूर्वी ग्रामपंचायतीत सत्तेत असलेल्यांनी २ लाख ८८ हजार रुपये थकीत ठेवले होते. आम्ही आतापर्यंत एक लाखांच्या पाणीपट्टीचा भरणा केला आहे. नागरिकांनी नियमित पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन नगराध्यक्ष रजनीताई भडके यांनी केले.
सावली येथे घागर मोर्चा
By admin | Updated: October 22, 2016 00:50 IST